शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः फडणवीसांना धक्का; महायुतीच्या पाच मंत्र्यांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 15:05 IST

Maharashtra Election Result 2019: भाजपाच्या तीन, तर शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना धक्का

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे. भाजपा, शिवसेनेच्या जागा कमी होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दुहेरी धक्का बसला आहे. अब की बार 200 पारची घोषणा देणाऱ्या महायुतीला पावणे दोनशेचा आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे. त्यातच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या पाच सहकाऱ्यांचा पराभव झाला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचे मंत्री राम शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला. जलसंवर्धन मंत्री असलेल्या शिंदेंना राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी धक्का दिला. रोहित पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना परळीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंनी पंकजा यांना जवळपास 20 हजार मतांनी पराभूत केलं. मुंडे बंधू भगिनींमधल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपा नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांचादेखील पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी भेगडेंना धक्का दिला आहे. भाजपासोबतचे शिवसेनेच्या मंत्र्यांनादेखील मतदारांनी घरचा नारळ दाखवला आहे. शिवसेना नेते विजय शिवतारेंना पुरंदरमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी त्यांचा पराभव केला. जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांना पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी त्यांचा पराभव केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRam Shindeराम शिंदेPankaja Mundeपंकजा मुंडेArjun Khotkarअर्जुन खोतकर