शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा कुस्तीवरून पवारांना टोला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 13:40 IST

Maharashtra Election Result 2019 मुख्यमंत्री आणि पवारांमधील वाकयुद्ध सुरुच

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुस्तीवरुन वाकयुद्ध रंगलं होतं. साताऱ्यातल्या सभेत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या तोंडात कुस्ती, पैलवान शब्द शोभत नाहीत, असा टोला लगावला होता. त्याला आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या पैलवानाचे 54 आले आणि माझे 105 आले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर पलटवार केला. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपामध्ये मेगाभरती सुरू होती. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात दाखल झाले. त्यावर भाष्य करताना आता पवारांसोबत कोणीही शिल्लक राहिलं नाही. आमचे पैलवान तेल लावून आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी पैलवानच दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. यानंतर कुस्ती आणि पैलवान शब्दांवरुन मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये चांगलीच जुंपली होती. विधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदार भाजपात गेले असले तरीही राष्ट्रवादीनं चांगली लढत दिली. त्यावरुन अनेकांनी शरद पवारांच्या विजिगीषू वृत्तीचं कौतुक केलं. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावला. 'कोण त्यांना (पवारांना) मॅन ऑफ द मॅच म्हणतंय. कोण मॅन ऑफ द सीरिज म्हणतंय. पण सरकार कोणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं,' असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेनं सत्तेच्या समान वाटपाचा आग्रह लावून धरला आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊ, असं कधीच कबूल केलं नव्हतं. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असं काहीही होणार नाही, सीएमपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असं अमित शहांनी मला सांगितल्याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस