शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 07:41 IST

Maharashtra Election Result 2019: काँग्रेस खासदाराची भाजपावर जोरदार टीका

नवी दिल्ली: भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत असल्याची टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणूक निकालावरुन आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालाबद्दल मला मतदारांचं अभिनंदन करायचं आहे. हरयाणा असो वा महाराष्ट्र किंवा देशात अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुका असोत, भाजपाचा पूर्णपणे पराभव झाला आहे. त्यांना चौटाला आणि अपक्ष आमदारांसमोर सत्ता स्थापन करण्यासाठी भीक मागावी लागत आहे. महाराष्ट्रात तर त्यांना अद्यापही सत्ता स्थापन करता आलेली नाही, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. निवडणुकीच्या तोंडावर मूळ मुद्द्यांपासून मतदारांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो, असं आझाद म्हणाले. 'निवडणूक जवळ आली की क्षेपणास्त्रं डागायची, हा भाजपाचा फॉर्म्युला आहे. मात्र तो जनतेनं नाकारला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था यांच्यासारख्या समस्या जनतेला महत्त्वाच्या वाटतात. मात्र भाजपाला त्याबद्दल काहीही वाटत नाही,' अशी टीका आझाद यांनी केली. भाजपाला लोकांची चिंता नाही. नोटबंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. जीएसटीमुळे सर्वसामान्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. पेट्रोलचे दर वाढत आहेत. सरकारवर रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेण्याची वेळ आली आहे. मात्र याचं भाजपाला काहीच वाटत नाही, असं आझाद म्हणाले. भाजपा सतत इलेक्शन मोडमध्ये असते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. भाजपा केवळ निवडणुका लढवण्यासाठी सत्तेत आली आहे. ते स्वप्नातही निवडणुका लढवत असतात. मंत्रालयातल्या कामकाजावेळीही भाजपाची नेते मंडळी निवडणुकांसाठी व्यूहनीती आखत असतात, असं आझाद यांनी म्हटलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसharyana election 2019हरियाणा निवडणूक