मुंबई: राज्यातली महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट दिसत आहे. बहुतेक एक्झिट पोल्सनी महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला होता. अनेक एक्झिट पोलमधून महाआघाडीची धूळधाण होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात महाआघाडीनं महायुतीला चांगली लढत दिली. महायुतीनं अब की बार 200 चा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीला 160 जागा मिळताना दिसत आहेत. यामध्ये भाजपाच्या 104 आणि शिवसेनेच्या 56 जागांचा समावेश आहे. तर महाआघाडी जवळपास 100 च्या आसपास पोहोचली आहे. यापैकी काँग्रेसला 45, तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जवळपास अनेक वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल चुकले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमधून महायुतीला मोठं यश मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हे अंदाजदेखील आज चुकीचे ठरले.मतदानानंतर जाहीर झालेल्या सर्व एक्झिट पोलचे आकडे असेः एबीपी - सी व्होटर
महायुती - १९२ ते २१६महाआघाडी - ५५ ते ८१इतर - ४ ते २१
.....................
इंडिया टुडे-एक्सिस
महायुती - १६६ ते १९४ (भाजपा १०९ ते १२४ + शिवसेना ५७ ते ७०)
महाआघाडी ७२ ते ९०(काँग्रेस ३२ ते ४० + राष्ट्रवादी ४० ते ५०)...................................
न्यूज १८ - IPSOS
महायुती - २४३ (भाजपा १४१ + शिवसेना १०२)महाआघाडी - ३९ (काँग्रेस १७ + राष्ट्रवादी २२)
.....................
रिपब्लिक टीव्ही - जन की बात
महायुती २१६ ते २३०(भाजपा १३५ ते १४२ + शिवसेना ८१ ते ८८)
महाआघाडी ५० ते ५९(काँग्रेस २० ते २४ + राष्ट्रवादी ३० ते ३५)
इतर - ८ ते १२
.....................
पोल डायरी
भाजपा - १२१ ते १२८शिवसेना - ५५ ते ६४काँग्रेस - ३९ ते ४६राष्ट्रवादी - ३५ ते ४२इतर - ३ ते २७
.....................
टाइम्स नाऊ
महायुतीः २३० महाआघाडीः ४८ इतरः १०