शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 09:19 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. महायुतीने पुन्हा एकद एकहाती सत्ता मिळवली. २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळविला. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीआधी राज्यात खासदार शरद पवार यांच्या पक्षात भाजपातील नेत्यांनीही प्रवेश केला. 

सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत

विधानसभा निवडणुकीआधी भाजपामधून कागलचे समरजीत घाटगे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, बेलापूरमधील संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या तिनही नेत्यांना खासदार शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले. 

हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात पाटील यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना ११७२३६ एवढी मत मिळाली. तर हर्षवर्धन पाटील यांना ९७८२६ एवढी मत मिळाली. अजित पवार गटातील दत्तात्रय भरणे यांनी १९४१० मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. 

समरजीत घाटगे

समरजीत घाटने यांनीही विधानसभा निवडणुकीआधीच भाजपातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. खासदार शरद पवार यांनी त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवली. मुश्रीफ यांना १४५२६९ एवढी मत मिळाली, तर घाटगे यांना १३३६८८ एवढी मत मिळाली. मुश्रीफ यांनी ११५८१ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. 

संदीप नाईक

बेलापूरमध्ये अर्ज दाखल करण्याच्या आधी मोठी राजकीय घडमोड झाली. भाजपातून संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प्रवेश केला. संदीप नाईक यांनी भाजपाच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात निवडणूक लढवली.  या निवडणुकीत संदीप नाईक यांचा निसटता पराभव झाला आहे. भाजपाच्या मंदा म्हात्रे यांना ९१८५२ एवढी मत मिळाली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ९१४७५ एवढी मत मिळाली. मंदा म्हात्रे यांनी ३७७ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. 

शरद पवार गटाला केवळ १० जागांवर

महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे. काँग्रेस १६, उद्धवसेनेला २० तर शरद पवार गटाला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले आहे.  तिन्ही पक्षांचे मिळून राज्याचा गतिमान विकास करणारे सरकार आम्ही देऊ, अशी ग्वाही महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राला दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस