शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 07:32 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights पवार यांच्या पक्षाने कालच्या निकालात केवळ सात जागा जिंकल्या. सातारा व कोल्हापूर या त्यांच्या बाले-किल्ल्यात एकही जागा मिळाली नाही.

वसंत भोसले

कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार यांचा अभेद्य गड! साखरपट्ट्याच्या आधारे आणि सहकार चळवळीच्या बांधणीने गेली सहा दशके हा गड यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते-पाटील आणि शरद पवार यांनी मजबूत ठेवला होता. भाजपने देशाची सत्ता हस्तगत केली तरी या गडाला भेगा गेल्या नव्हत्या. मात्र, भाजपने महायुतीच्या बळावर विधानसभा निवडणुकीत ५८ पैकी ४६ जागा जिंकत तो ढासळून टाकला.

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून समाजाच्या सर्व घटकात विस्तारलेल्या काँग्रेस पक्षाला पराभूत करणे सोपे नव्हते. सहकाराच्या माध्यमातून संस्थात्मक मोठे बळ त्यांच्या बाजूने होते. अलिकडच्या तीन दशकांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. पुणे जिल्ह्यातील २१ पैकी अकरा जागा मागील निवडणुकीत जिंकत विभागातील एकूण २७ जागी राष्ट्रवादी विजयी झाली होती. पवार यांच्या पक्षाने कालच्या निकालात केवळ सात जागा जिंकल्या. सातारा व कोल्हापूर या त्यांच्या बाले-किल्ल्यात एकही जागा मिळाली नाही.

काँग्रेसची अवस्था त्याहून दारुण पराभवाने विकलांग झाली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विश्वजित कदम यांची एकमेव जागा मिळाली व उबाठा दोन ठिकाणी जिंकल्याने महाआघाडीला केवळ दहा जागा मिळाल्या. याउलट भाजपने दोन डझन जागा जिंकून मुसंडी मारली. अजित पवार गटाला पाच आणि शिंदेसेना सात अशा ४२ जागा जिंकून मोठी मजल मारली. इतर जागांमध्ये जनसुराज्यच्या दोन आणि दोन्ही अपक्ष युतीचेच समर्थक आहेत. ही बेरजेची उडी ४६ वर जाते. काँग्रेस विरोधकांना आजवर मिळालेले सर्वोत्तम यश आहे.

पाच मुद्द्यांत विश्लेषण

महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याने घटक पक्षांची मदत झाली नाही.महायुतीच्या ध्रुवीकरणाच्या प्रचारास समर्थपणे उत्तर देता आले नाही. बटेंगे तो कटेंगे याला प्रत्युत्तर दिलेच नाही. भाजपने पूूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेत्यांना उमेदवारी देताना खूप बळही दिले. लाडकी बहिण योजनेचा परिणाम अधिक झाला. शिवाय पैशाचा सढळ हाताने वापर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक घेऊन जाता आली नाही. त्यांच्या नाराजीचा लाभ आघाडीने करून घेतला नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस