शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

राखीव मतदारसंघांचाही भाजपवर विश्वास; अनुसूचित जातीच्या २९ पैकी १० जागांवर भाजप विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 09:15 IST

काँग्रेसने तीन, तर उद्धवसेनेने दोन जागा गमावल्या

विशाल सोनटक्केयवतमाळ - अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या राज्यातील २९ मतदारसंघांपैकी तब्बल दहा मतदारसंघांत भाजपचा विजयाचा झेंडा फडकला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सात जागा जिंकल्या होत्या. यातील तीन जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे चौघांनी तिसऱ्यांदा, तर तिघांनी सलग चौथ्यावेळी विजयाचा गुलाल उधळला. मिरज मतदारसंघातून सुरेश खाडे हे तब्बल पाचव्या वेळी विजयी झाले आहेत. 

सन २००८ च्या परिसीमनानंतर राज्यात अनुसूचित जातीचे २९, तर अनुसूचित जमातीचे २५ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २९ मतदारसंघांपैकी भाजपने नऊ, काँग्रेसने सात, राष्ट्रवादी काँग्रेसने सहा, शिवसेना पाच, तर अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळविला होता. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्येही अनुसूचित जातीसाठीच्या या २९ जागांपैकी सर्वाधिक १० जागा भाजपने जिंकल्या आहेत. काँग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. उद्धवसेना आणि  शरद पवार गटाला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या; तर  शिंदेसेना आणि अजित पवार गटाने प्रत्येकी चार जागा पटकावल्या आहेत. हातकणंगले येथील एक जागा जनस्वराज्य पक्षाने जिंकली आहे.

चौघांनी मारला विजयाचा चौकार 

अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातील भुसावळचे उमेदवार संजय सावकारे, औरंगाबाद पश्चिममधील शिंदेसेनेचे संजय शिरसाट आणि अंबरनाथमधील बालाजी किणीकर हे तीन उमेदवार सलग चौथ्या वेळी विजयी झाले; तर नागपूर उत्तरमधून काँग्रेसचे नितीन राऊत, भंडारातून  नरेंद्र भोंडेकर, बदनापूरमधून नारायण कुचे आणि पुण्यातील पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे हे सलग तिसऱ्या वेळी विजयी झाले. नांदेडमधील देगलूर येथून काँग्रेसतर्फे रावसाहेब अंतापूरकर दोन वेळा निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर पुत्र जितेश अंतापूरकर यांनी पोटनिवडणूक जिंकली. यावेळी ते दुसऱ्यांदा भाजपतर्फे विजयी झाले. 

लोकसभेत ४ पैकी ३ जागा गमावल्या होत्या

लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी चार मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी भाजपचा पराभव झाला होता. दिंडोरीत तेव्हाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, नंदुरबारमध्ये डॉ.हीना गावित तर गडचिरोलीत अशोक नेते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मतविभाजनाचा फायदा होऊन पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा जिंकले होते. भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांनी प्रचारात समान नागरी कायदा आणणार असे जाहीर केले होते. असा कायदा आल्यास आदिवासींना घटनेने दिलेले विशेष हक्क संपुष्टात येतील, असा प्रचार मविआ नेत्यांनी केला आणि त्याचा फटका भाजपला बसला असे समोर आले होते.

मिरजमधून सुरेश खाडे पाचव्या वेळी विजयीमिरज या राखीव मतदारसंघातून भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे हे उद्धवसेनेच्या तानाजी सातपुते यांचा पराभव करून पाचव्या वेळी विजयी झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षाचे ज्ञानराज चौगुले यांचा मात्र चौथ्या वेळी पराभव झाला आहे. साताऱ्यातील फलटण येथेही तीन वेळा आमदार राहिलेल्या दीपक चव्हाण यांना यावेळी पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून खासदार वर्षा गायकवाड या काँग्रेसकडून सलग तीन वेळा आमदार होत्या. आता या जागेवर ज्योती गायकवाड निवडून आल्या आहेत. वाशिमची राखीव जागाही भाजपने सलग चौथ्यावेळी राखली आहे. येथून लखन मलिक सलग तीन निवडणुकांत भाजपतर्फे विजयी झाले होते. यावेळी भाजपने श्याम खोडे यांना उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजयाचा गुलाल उधळला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस