शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 17:38 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रातील महायुतीच्या या विजयाचे श्रेय निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केलेल्या एका घोषनेला दिले जात आहे...

Maharashtra Assembly Election 2024 Results : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान केले आहे. राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार स्थानप होत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील बहुतांश एक्झिट पोल महायुतीच्याच बाजूने होते. मात्र महायुतीचा एवढा मोठा विजय होईल, असा अंदाज कुणीही वर्तवला नव्हता. महाराष्ट्रातील महायुतीच्या या विजयाचे श्रेय निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केलेल्या एका घोषनेला दिले जात आहे.

खरे तर, महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीच्या शिंदे सरकारने निवडणुकीपूर्वी 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली होती. ही योजना गेम चेंजर ठरली. निवडणुकीत या योजनेचा महायुतीला प्रचंड फायदा झाला आणि महायुतीने विक्रम विजय मिळवला. यापूर्वी मध्य प्रदेशातही 2023 च्या निवडणुकीपूर्वी शिवराज सरकारने 'लाडली बहन' योजना जाहीर केली होती. 

एक्झिट पोल पेक्षाही मोठं यश - मराराष्ट्र विधानसभेसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर आणि निकालापूर्वी आलेले जवळपास सर्वच एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने होते. मात्र महायुतीला एवढा मोठा विजय  मिळेल, या बाजूने ते नव्हते. मात्र प्रत्यक्ष निकालात महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय जनता पार्टी सलग तिसऱ्यांदा राज्यातील सर्वात मोठी पार्टी अथवा पक्ष ठरला आहे.

बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>

मुख्यमंत्री कोण होणार? -तत्पूर्वी, पत्रकारांसोबत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांच्या मनातील मुख्यमत्रीपदाच्या प्रश्नासंदर्भातही भाष्य केले, ते म्हणाले, "यासंदर्भात (मुख्यमंत्री पदासंदर्भात) अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, मुख्यमत्रीपद हे कुठल्याही निकशावर नाही, तर मुख्यमंत्रीपद हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील. एकनाथराव शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजित दादा  त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना आमचे पार्लमेटरी बोर्ड नियुक्त करते. ते बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. कुठलाही वाद नाहीये, कुठलाही विवाद नाहीये." 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस