शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 05:59 IST

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाचे नाव ३० नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले.

मुंबई - चौदाव्या विधानसभेची मुदत संपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा दिला. राज्यपालांनी तो स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी आदी उपस्थित होते.

शिंदे यांनी राजीनामा दिल्याने राज्य मंत्रिमंडळही बरखास्त झाले आहे. त्यामुळे या सरकारमधील सगळे मंत्री आता माजी मंत्री झाले आहेत. २४ नोव्हेंबरला आयोगाकडून पंधराव्या विधानसभेसाठी निवडून आलेल्या २८८ सदस्यांची यादी राज्यपालांना सादर करण्यात आली. राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे आता पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली आहे. 

भाजपचे निरीक्षक कधी?  

शिंदेसेनेने एकनाथ शिंदे यांना, तर अजित पवार गटाने अजित पवार यांना आधीच विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले आहे. भाजपबाबत प्रतीक्षा आहे. सूत्रांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांत भाजपच्या आमदारांची नेता निवडीसाठी मुंबईत बैठक होईल. या बैठकीसाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक येणार आहेत. ही बैठक गुरुवारी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदी कोण ३० नोव्हेंबरपर्यंत ठरणार

मुख्यमंत्रिपदाचे नाव ३० नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले. त्यावरून २ डिसेंबरला शपथविधी होईल असा तर्क दिला जात आहे.

शब्द दिला नव्हता : दानवे

भाजपाने शिंदेसेनला किंवा शिंदेसेनेने भाजपला मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिलेला नव्हता, असे भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले.  शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय तिघांनाही मान्य असेल. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले की, येत्या दोन-तीन दिवसांत सरकारचा मार्ग सुकर झालेला दिसेल.

आठवलेंच्या विधानाला शिंदेसेनेचे प्रत्युत्तर

शिंदे यांना भाजपाने निर्णय कळविला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतील, हेही त्यांना सांगितले आहे. शिंदे यांनी दिल्लीच्या राजकारणात गेले पाहिजे, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यावर, शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाच्या निर्णय प्रक्रियेत आठवले नसतात. तीन पक्षांचे शीर्षस्थ नेते बसून या पदाबाबतचा निर्णय घेतील. आमच्या पक्षाला कोणताही निरोप भाजपाकडून आलेला नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीRamdas Athawaleरामदास आठवले