शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 12:27 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसला आव्हान दिले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे उद्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहेत. एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत, काही एक्झिटमध्ये महायुतीचे सरकार येणार, तर काही काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसला आव्हान दिले आहे. 

Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!

कालपासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रि‍पदावर भाष्य केले. खासदार संजय राऊत म्हणाले, उद्या दहा नंतर मी मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार. महाविकास सरकार आले तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय महाराष्ट्रात होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते येथे येतील त्यांना दिल्लीतून मँडेट घेऊनच येथे यावे लागले, असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिले. शरद पवार, उद्धव ठाकरे मुंबईत आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ, नाहीतर भारतीय जनता पक्ष आमच्या हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके ते क्रुर लोक आहेत, असा टोलाही राऊत यांनी भाजपाला लगावला. 

सोलापुरातील वादावर बोलताना राऊत म्हणाले,  दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृत सुटल्यावर महाविकास आघाडीच्या सर्व जणांनी काम करणे अपेक्षित होतं, महाराष्ट्रात काही ठिकाणी असे प्रकार झाले आहेत,काही अपवाद आहेत उद्या निकाल लागल्यावर एकत्र बसून चर्चा करू.  का घडतंय हे तपासून पहावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले. 

"सरकार मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात. आमच्याबरोबर डावी पक्ष आहेत शेकाप आहे.हे सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत. काही अपक्षाने पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे.जे पैशांचे बंडल डोक्याखाली ठेवून झोपतात त्यांना ५० -१०० कोटीची ऑफर अपक्षांना केली आहे. ज्यांना जिंकून येत नाही त्यांनी अपक्षांना बंडलांच्या थैल्या पाठवल्या जात आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस