शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 17:17 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथील सभेतून विरोधकांवर निशाणा साधला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आजपासून महाराष्ट्रात प्रचारसभांना सुरुवात केली आहे. शाह यांनी आज पहिलीच जाहीर सभा सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे घेतली. या सभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तर दुसरीकडे अमित शाह यांनी या सभेत शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत एक वक्तव्य केले. या वक्तव्यावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला

दरम्यान, आता या वक्तव्यावरुन  राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिराळा येथील सभेत बोलताना म्हणाले, 'समर्थ रामदास यांचे चरण जिथे पडले ती ही भूमी आहे. गुलामीकाळात   रामदासांनी तरुणांना एकत्र करुन शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्याचे काम केले', अस वक्तव्य शाह यांनी केले. या वक्तव्यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांना तुम्ही जर जोडलं किंबहुना आणि कोणी त्यांना गुरु म्हणत आहेत तस होऊ शकत नाही. शिवाजी महाराज यांचे एकच गुरु ते आहेत जिजाऊ माँसाहेब  म्हणून त्यांच महत्व आहे त्या ठिकाणी असाव. त्यांच्या महत्वाला आम्ही चॅलेंज करत नाही,पण शिवाजी महाराज यांना जोडायचं हे न पटणार आहे, असं सांगत माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे. 

अमोल मिटकरींनी ट्विट करुन टोला लगावला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही केंद्रीय मंत्री मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. आमदार मिटकरी यांनी ट्विट करुन टीका केली. मिटकरी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'शिराळा येथील सभेत केंद्रीय मंत्री अमितजी शहा यांनी छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात त्यांना स्क्रिप्ट कोणी लिहून दिली हे शोधलं पाहिजे. बाहेरून येणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केल्याशिवाय त्या विषयावर बोलू नये, असा सल्लाही मिटकरींनी दिला.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmit Shahअमित शाहSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती