शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 06:10 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे.

- असिफ कुरणेकोल्हापूर : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे. अनेक राजकीय उलथापालथीत देखील या महारथींनी आपले बालेकिल्ले शाबूत ठेवले आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून हे नेते आपल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत आहेत. सत्तेत असो की विरोधात येथील जनतेने देखील आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवत त्यांना विधानसभा सभागृहात पाठविले आहे. राज्यातील असेच काही अभेद्य मतदारसंघ व तेथील आमदारांचा आढावा.गणपतराव देशमुख (सांगोला) :सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून तब्बल ११ वेळा विजय मिळविला आहे. १९७८ व १९९९ मध्ये ते मंत्री होते. ‘देशात सर्वाधिक काळ आमदार’ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यानंतर सर्वाधिक काळ करुणानिधी हे १० वेळा आमदार राहिले आहेत.शरद पवार, अजित पवार ( बारामती) :पवार कुटुंबीय व बारामती यांचे वेगळे नाते असून हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातूनशरद पवार व अजित पवार प्रत्येकी सहावेळा आमदार झाले आहेत. आता सातव्यांदा अजित पवार येथून मैदानात उतरतील. सन १९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे या प्रथम येथून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर पवार कुटुंबाचेच या मतदारसंघावर वर्चस्व आहे.जीवा पांडू गावित (सुरगाणा)सुरगाणा व कळवण मतदारसंघांतून जीवा गावित सातव्यांदा आमदार झाले आहेत. १३ व्या विधानसभागृहात ते ‘सीपीआय’चे एकमेव आमदार आहेत. डाव्या पक्षांची पीछेहाट होत असताना गावित यांनी आपला डाव्यांचा गढ कायम राखण्यात यश मिळविले आहे.जयंत पाटील (वाळवा, इस्लामपूर) :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे १९९० पासून प्रतिनिधित्व करत आहेत. ते सहावेळा आमदार झाले आहेत. त्यांनी मंत्री म्हणून अर्थ, गृह, ग्रामविकास अशी खाती सांभाळली. नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला.एकनाथ खडसे (मुक्ताईनगर) :जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा गड आहे. या मतदारसंघातून खडसे सहावेळा आमदार झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघात सन १९९० मध्ये खडसे यांनी विजय मिळविला. तेव्हापासून ते येथे प्रतिनिधित्व करत आहेत.बाळासाहेब थोरात (संगमनेर) :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ त्यांचा गड आहे. या ठिकाणातून ते सातवेळा विजयी झाले असून आठव्यांदा मैदानात उतरत आहेत. बी. जे. खताळ-पाटील यांच्यानंतर थोरात हे आमदार झाले.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) :अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे प्रतिनिधीत्व करणारे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे पाचवेळा विजय मिळवला आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र शिर्डी हा मतदारसंघ ठरला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.विलासराव देशमुख (लातूर ) :लातूर येथून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पाचवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा १९९५ मध्ये शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर विलासराव दोनवेळा विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर पुत्र अमित देशमुख हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.सुरूपसिंग नाईक (नवापूर )नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर हा आरक्षित मतदारसंघ सुरूपसिंग नाईक यांचा गड. येथून ते आठवेळा विजयी झाले. त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. २००९ मध्ये त्यांना १७०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.आर. आर. पाटील (तासगाव) :तासगाव मतदार संघालामाजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी देशपातळीवर ओळख मिळवून दिली. सन १९९०पासून त्यांनी सहावेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर आर. आर. आबांच्या पत्नी सुमनताईपाटील या प्रतिनिधित्व करत आहेत.पतंगराव कदम(पलूस, कडेगाव ) :काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम हे येथून सहावेळा निवडून आले व दोनदा पराभूत झाले होते. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर हा त्यांचा गड मानला जातो. कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण