Vidhan Sabha 2019: मतदारनोंदणीची प्रक्रिया ४ ऑक्टोबरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 03:46 AM2019-09-22T03:46:33+5:302019-09-22T03:47:22+5:30

राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 Voting process till October 4 | Vidhan Sabha 2019: मतदारनोंदणीची प्रक्रिया ४ ऑक्टोबरपर्यंत

Vidhan Sabha 2019: मतदारनोंदणीची प्रक्रिया ४ ऑक्टोबरपर्यंत

Next

मुंबई : राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नोंदणी करणाऱ्यांना निवडणुकीत मतदान करता येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.

आचारसंहिता भंगाची प्रकरणे रोखण्यासाठी सी-व्हिजील अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. आचारसंहिता भंग होत असल्याचे दिसून आल्यास दक्ष नागरिक त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून त्याची तक्रार नोंदवू शकतात, असेही बलदेवसिंह यांनी सांगितले.
२०११च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांच्या मागे ९२५ महिला असे प्रमाण होते. तर २०१४ मध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ८८९ महिला असे प्रमाण होते. आता २०१९मध्ये महिलांच्या संख्येत वाढ झाली असून एक हजार पुरुषांच्या मागे ९१४ असे प्रमाण आहे. दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा म्हणून यंदा सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणली आहेत.

टोल फ्री क्रमांक
मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी व तक्रारींसाठी १९५० हा चोवीस तास कार्यरत टोल फ्री क्रमांक आहे. ३१ आॅगस्टपर्यंत महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार आहेत. २०१४ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये ५९ लाख १७ हजार ९०१ इतकी वाढ झाली आहे. २०१४ साली ९०.४३ टक्के मतदारांकडे व्होटर आयडी होते. हे प्रमाण २०१९ मध्ये ९६.८१ टक्के इतके झाले.
सर्व विधानसभा मतदारसघांमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटचा वापर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच होणार आहे. निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत.

बँकेच्या व्यवहारांवर लक्ष
निवडणुकीच्या काळात बेकायदा मद्याची वाहतूक व विक्री व मतदारांना इतर प्रलोभने दाखवली जाणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येईल. त्याशिवाय इन्कम टँक्स, एक्साईज विभागाची दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय बँकांमधून होणा-या मोठ्या रक्कमांच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Voting process till October 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.