शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Vidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार! २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:28 IST

पुन्हा फडणवीस सरकार की, सत्तांतर होणार?; आघाडीचं ठरलं, युतीचं घोडं का अडलं?; मनसेच्या ‘राजगडा’ला केव्हा जाग येणार?

नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे; तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारराजाने दिलेला कौल धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येलाच निकालाच्या स्वरूपात जाहीर होईल आणि ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर नवे सरकार सत्तारूढ होण्याचा मार्ग मोकळा झालेला असेल. राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पुन्हा संधी देणार की, २०१४ प्रमाणे राज्यात सत्तांतर घडवून आणणार, याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागून आहे.केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसह देशातील ६४ विधानसभा आणि बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी नवी दिल्ली येथे जाहीर केला. त्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लांबणीवर टाकली. महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार असून, त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रे असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.तीन आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा रिंगणातया निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अशोक चव्हाण (भोकर) आणि पृथ्वीराज चव्हाण (कºहाड) हे तीन आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा रिंगणार उतरणार असून, या मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.वंचित फॅक्टर चालणार का?अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत सात ते आठ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग रोखला होता. मात्र, त्या वेळी एमआयएमसोबत त्यांची युती होती. आता ही युती संपुष्टात आल्याने विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर किती चालणार, याविषयी उत्सुकता आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करणार?लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता प्रचारसभा घेऊन मोदी सरकारवर तोफा डागलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख विधानसभा निवडणूक लढविणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मनसे शंभर जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र या १०० जागा कोणत्या, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रम२७ सप्टेंबर (शुक्रवार)- उमेदवारी अर्ज दाखल करता येणार४ ऑक्टोबर (शुक्रवार)- अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस५ ऑक्टोबर (शनिवार)- अर्जांची छाननी७ ऑक्टोबर (सोमवार)- अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस१९ ऑक्टोबर (शनिवार)- प्रचाराचा शेवटचा दिवस२१ ऑक्टोबर (सोमवार)- मतदान२४ ऑक्टोबर (गुरुवार)- निकाल

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस