शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: शिवसेनेची ताठर भूमिका, 'या' जागांवरुन युतीमध्ये कमालीचा तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:03 IST

आता मध्यस्थाची मदत; जागावाटपाचा तिढा कायम

मुंबई : भाजप-शिवसेनेची युती पक्की असल्याचे दोन्ही बाजूंचे नेते सांगत असताना प्रत्यक्षात जागा सोडण्यावरून तणाव आहे. एकेका जागेसाठी शिवसेनेने ताठर भूमिका घेतल्याने चर्चेबाबत संयम तरी किती ठेवायचा, असा सवाल भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चर्चेची सूत्रे हाती घेतली असून, नीरज गुंडे नावाच्या मध्यस्थाची मदतही घेतली जात आहे.युती होत आली की, सेनेकडून मान्य न होणाऱ्या गोष्टी मागितल्या जातात. एकेका जागेचा तिढा चार-चार तास चर्चा करूनही सुटणार नसेल, तर अवघड आहे. जिथे उमेदवार नाही, तिथेही जागा मिळण्याबाबत शिवसेना अडून बसणार असेल, तर अवघड आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.अशीच उद्विग्नता शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली. शिवसेनेला हक्काच्या जागाही भाजप मागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सेनेला १२० ते १२५ पर्यंत जागा दिल्या जातील, हे जवळपास पक्के आहे. किमान १५ जागांवरून युतीत तणाव आहे. नागपूर, पुणे, अकोला, नाशिकमध्ये जागा न देण्याच्या भाजपच्या भूमिकेने सेनेत अस्वस्थता आहे, तर मराठवाड्यातील तीन जिल्हे, सोलापूर, मुंबई, कोकणात भाजपला जागा सोडायला सेना तयार नाही.मध्यस्थ म्हणून काम करणारे नीरज गुंडे रा. स्व. संघाचे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचेही विश्वासू आहेत.भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते कोअर कमिटीने जाणून घेतली. त्यांनी कोणती जागा शिवसेनेला सोडा वा सोडू नका, याबाबत मत दिले. भाजपची उमेदवारी कोणाला द्यावी, यावरही स्पष्ट मत दिले. सेनेला हव्या असलेल्यांपैकी किमान २० जागा सोडण्यास त्यांनी विरोध दर्शविला.फाळणीपेक्षाही कठीण-राऊतभारत-पाकिस्तान फाळणीवेळी जेवढ्या वाटाघाटी झाल्या नसतील, तेवढ्या युतीच्या जागावाटपासाठी होत आहेत. सत्तेत सहभागी होण्याऐवजी विरोधी पक्षात असतो, तर स्वबळावर सरकार आणले असते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली.युती नक्की होणार - पाटीलयुतीची चर्चा योग्य दिशेने सुरू आहे आणि ती नक्की होईल. युती होऊ नये, यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्यांना कुठलाही आनंद मिळणार नाही. युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. कुठल्याही क्षणी जागावाटपाबाबत एकमत होईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.राणेंबाबत मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चामाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश कधी होईल, या प्रश्नात चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही गोष्टी मित्रपक्षाशी बोलून ठरवाव्या लागतात. याबाबतही मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करीत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस