Vidhan Sabha 2019: आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात?; काय सांगतो भाजपाचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 10:53 AM2019-09-18T10:53:15+5:302019-09-18T13:05:35+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2012 मध्ये पुन्हा एकदा एमजीपी आणि भाजपा एकत्र आली. मात्र तोपर्यंत भाजपाने राज्यात आपले पाय रोवले होते. भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढविली तर एमजीपीला फक्त 7 जागांवर निवडणूक लढवावी लागली.

Maharashtra Vidhan Sabha 2019, Shiv Sena threatens existence in upcoming assembly elections? What tells the history of the BJP | Vidhan Sabha 2019: आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात?; काय सांगतो भाजपाचा इतिहास

Vidhan Sabha 2019: आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात?; काय सांगतो भाजपाचा इतिहास

Next

मुंबई - महाराष्ट्रात काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रत्येकी 125 जागा लढविण्यावर एकमत झालं असून इतर जागा मित्रपक्षांना देण्याचं ठरलं आहे. तर दुसरीकडे आमचं ठरलंय म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचे घोडं अद्याप अडलं आहे. विधानसभा निवडणुकीत 50-50 फॉर्म्युलावर शिवसेना ठाम आहे तर भाजपा 120 जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. 

1989 मध्ये राम मंदिरासाठी देशभरात हिंदू लोकांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळाल्यानंतर शिवसेना-भाजपाने पहिल्यांदा युती केली. तेव्हापासून 2014 पर्यंत शिवसेनेने नेहमी भाजपापेक्षा अधिक जागांवर निवडणुका लढविल्या आहेत. राज्यात 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेना मोठ्या भावाची भूमिका घेत होती. मात्र 2014 निवडणूक भाजपा-शिवसेनेने वेगवेगळ्या लढल्या. या निवडणुकीत शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा भाजपाच्या निवडून आल्या.

Image result for भाजपा-शिवसेना प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरे

शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आलं आहे. जर सध्याच्या वातावरणात भाजपाच्या धमकीला घाबरत जर युतीत शिवसेनेने कमी जागा लढविल्या तर निवडणुकीनंतर भाजपा शिवसेनेला टार्गेट करु शकते. त्यावेळी राज्यात विरोधी पक्ष कमकुवत झालेला असेल. शिवसेनेसाठी गोव्याच्या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे मोठं उदाहरण आहे. 

Image result for भाजपा-शिवसेना

भाजपाने गोव्यात ज्यापद्धतीने महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाची अवस्था केली तशी अवस्था उद्या महाराष्ट्रात शिवसेनेची होऊ शकते. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचा वापर करुन राज्यभरात भाजपाने आपले पाय रोवले. तशारितीने महाराष्ट्रात शिवसेनेची मदत घेऊन भाजपाने आपला गड निर्माण केला आहे. 

शिवसेना-भाजपाने लढविल्या विधानसभेच्या जागा 

  • 1990 मध्ये शिवसेनेने 183 तर भाजपाने 105 जागा लढविल्या होत्या. 
  • 1995 मध्ये शिवसेनेने 183 तर भाजपाने 105 जागा लढविल्या होत्या.
  • 1999 मध्ये शिवसेनेने 161 तर भाजपाने 117 जागा लढविल्या होत्या.
  • 2004 मध्ये शिवसेनेने 163 तर भाजपाने 111 जागा लढविल्या होत्या.
  • 2009 मध्ये शिवसेनेने 160 तर भाजपाने 109 जागा लढविल्या होत्या.

 

शिवसेनेसाठी मोठा धडा
गोव्यामध्ये 1961 मध्ये पोर्तुगाल राजवट संपल्यानंतर राज्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी पहिली सत्ताधारी पार्टी होती. 1963 ते 1979 पर्यंत एमजीपीने गोव्यात राज्य केलं. 1994 मध्ये पहिल्यांदा एमजीपीने आणि भाजपासोबत आघाडी करुन निवडणुका लढविल्या. एमजीपीने 25 जागा आणि भाजपाने 12 जागांवर निवडणूक लढविली. ही आघाडी त्याचवर्षी संपुष्टात आली मात्र यानिमित्ताने भाजपाला एमजीपीच्या मतांमध्ये फूट पाडण्याची संधी मिळाली. 

2012 मध्ये पुन्हा एकदा एमजीपी आणि भाजपा एकत्र आली. मात्र तोपर्यंत भाजपाने राज्यात आपले पाय रोवले होते. भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढविली तर एमजीपीला फक्त 7 जागांवर निवडणूक लढवावी लागली. एमजीपीचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने भाजपात सहभागी झाले. याचवर्षी मार्च महिन्यात एमजीपीच्या 3 पैकी 2 आमदारांनी आपला गट भाजपात विलीन केला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना कमकुवत करून भाजपा मजबूत करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019, Shiv Sena threatens existence in upcoming assembly elections? What tells the history of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.