Vidhan Sabha 2019 : राणे ‘स्वाभिमान’ भाजपामध्ये विलीन करणार; नीतेश राणे कमळ चिन्हावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 06:29 AM2019-09-18T06:29:03+5:302019-09-18T06:30:06+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला

Maharashtra Vidhan Sabha 2019 -Rane 'Swabhiman' will merge with BJP; Nitesh Rane will fight on lotus sign | Vidhan Sabha 2019 : राणे ‘स्वाभिमान’ भाजपामध्ये विलीन करणार; नीतेश राणे कमळ चिन्हावर लढणार

Vidhan Sabha 2019 : राणे ‘स्वाभिमान’ भाजपामध्ये विलीन करणार; नीतेश राणे कमळ चिन्हावर लढणार

Next

कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला असून, आपणही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा मंगळवारी येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी कणकवलीत दाखल झाल्यानंतर नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राणे यांचे दोन्ही सुपुत्र आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पुढील भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे. दिलेला शब्द ते पाळतील. लवकरच आपण मुंबईत दोन्ही सुपुत्रांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, तसेच स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन करणार आहे. त्यामुळे नीतेश राणे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, असे राणे यांनी सांगितले. मात्र, शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार का, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 -Rane 'Swabhiman' will merge with BJP; Nitesh Rane will fight on lotus sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.