शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

Vidhan Sabha 2019: भाजपची पहिली यादी जाहीर; 'या' दिग्गजांना वगळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:54 IST

बड्या नेत्यांना वगळल्यानं आश्चर्य व्यक्त

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं १२५ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. मात्र या यादीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील काही आजी-माजी मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही.भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा पहिल्या यादीत समावेश नाही. भाजपनं प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघाचं नाव नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीत त्यांना स्थान दिलं जाणार की त्यांचं तिकीट कापण्यात येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. खडसेंवर आरोप झाल्यानं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पक्षापासूनदेखील दूर गेले. माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचीही स्थिती खडसेंसारखीच आहे. २०१४ मध्ये मेहता घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडून आले. मात्र पहिल्या यादीत त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. गृहनिर्माण मंत्री म्हणून प्रकाश मेहता वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपच्या पहिल्या यादीत घाटकोपर पूर्व मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीत तरी त्यांना स्थान मिळणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नावाचादेखील पहिल्या यादीत समावेश नाही. यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे. तावडे २०१४ मध्ये बोरिवलीतून निवडून आले होते. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत बोरिवलीचा समावेश नाही. याशिवाय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचादेखील पहिल्या यादीत समावेश नाही. ते २००४, २००९ आणि २०१४ मध्ये चंद्रपूरमधील कामठी मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांच्या मतदारसंघाचा पहिल्या यादीत समावेश नाही. याशिवाय पहिल्या यादीत वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, कुलाब्याचे आमदार राज पुरोहित, मुलुंडचे आमदार सरदार तारासिंह यांचाही समावेश नाही. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलGirish Mahajanगिरीश महाजनEknath Khadaseएकनाथ खडसेPrakash Mehtaप्रकाश मेहताVinod Tawdeविनोद तावडेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019