Vidhan Sabha 2019 : चौघांचा नकार, मात्र अफवांचा बाजार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:28 AM2019-09-21T04:28:37+5:302019-09-21T04:29:48+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे आणि शिरपुरचे आमदार काशिराम पावरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - All four refused, but the rumor market continued | Vidhan Sabha 2019 : चौघांचा नकार, मात्र अफवांचा बाजार कायम

Vidhan Sabha 2019 : चौघांचा नकार, मात्र अफवांचा बाजार कायम

Next

धुळे : मुंबईत २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे आणि शिरपुरचे आमदार काशिराम पावरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ‘लोकमत’ ने चौघांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवेशाचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे जिल्हा बँँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे आणि माजी जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून सुरु आहे.
सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा धुळ्यात येईल, तेव्हा हा प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र महाजनादेश यात्रेदरम्यान तसे काही घडले नाही. त्यानंतर गुरुवारी नाशिक येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश होईल, अशी चर्चा सुरु झाली. मात्र यावेळेसही प्रवेशाचा मुहूर्त टळला. आता २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून सोशल मिडियावर सुरु आहे. काही वृत्त वाहिन्यांनी सुद्धा अशा बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
मात्र यासंदर्भात ‘लोकमत’ने वरील चौघा नेत्यांशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी अद्याप असा कुठलाही निर्णय झालेला नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - All four refused, but the rumor market continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.