शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Parishad Elections 2022: भाजपाच्या मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप; जाणून घ्या नक्की काय आहे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:39 IST

नक्की काय आहे आक्षेप.. वाचा सविस्तर

Maharashtra Vidhan Parishad Elections 2022: महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडलं. विधासभेच्या २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याचा हक्क बजावता आला नाही. विविध प्रकरणांमध्ये तुरूंगात असल्याने सुप्रीम कोर्टाने त्यांना मतदान करण्यास नकार दिला. पण उर्वरित २८५ आमदारांनी सायंकाळी चार वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडूनभाजपाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली.

 नक्की काय आहे आक्षेप?

विधान परिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीची असते. अशा प्रक्रियेमध्ये आपण मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका स्वत: फोल्ड करून मतपेटीत स्वत:च्या हाताने टाकायची असते. पण हे दोनही आमदार कर्करोगाशी झुंज देत असल्यामुळे त्यांना मतदानासाठी व्हीलचेअर वरून आणण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांनी मतदान करून झाल्यावर ही मतपत्रिका थेट मतपेटीत टाकणे शक्य नसल्याने सहकाऱ्यांना दिली आणि त्यांनी ती मतपत्रिका मतपेटीत टाकली. त्यामुळे अशा प्रकारे दुसऱ्याला मतपत्रिका देण्याबाबत भाजपाने आधीच निवडणूक आयोगाकडून परवानही घेतली होती का? तसे नसेल तर या नियमाचा भंग होतो अशा आशयाचा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMukta Tilakमुक्ता टिळकLakshman Jagtapलक्ष्मण जगतापBJPभाजपाcongressकाँग्रेस