शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोठी बातमी! काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला; दोन्ही भाजपा आमदारांची मते वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:36 IST

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022: मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडून भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मेलद्वारे केली होती.

विधान परिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीची असते. अशा प्रक्रियेमध्ये आपण मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका स्वत: फोल्ड करून मतपेटीत स्वत:च्या हाताने टाकायची असते. परंतू, भाजपाच्या दोन आजारी आमदारांनी त्यांच्या प्रतिनिधीद्वारे मत पत्रिका पेटीत टाकली होती. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. यावर राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळला आहे. 

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडून भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मेलद्वारे केली होती. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची १५ मिनिटांपासून बैठक सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय घेतला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु होईल. 

राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाची प्रत केंद्रीय आयोगाकडे पाठविण्यात येईल. यानंतर तिथे निर्णय घेतला जाणार आहे. 

 नक्की काय आहे आक्षेप?विधान परिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीची असते. अशा प्रक्रियेमध्ये आपण मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका स्वत: फोल्ड करून मतपेटीत स्वत:च्या हाताने टाकायची असते. पण हे दोनही आमदार कर्करोगाशी झुंज देत असल्यामुळे त्यांना मतदानासाठी व्हीलचेअर वरून आणण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांनी मतदान करून झाल्यावर ही मतपत्रिका थेट मतपेटीत टाकणे शक्य नसल्याने सहकाऱ्यांना दिली आणि त्यांनी ती मतपत्रिका मतपेटीत टाकली. त्यामुळे अशा प्रकारे दुसऱ्याला मतपत्रिका देण्याबाबत भाजपाने आधीच निवडणूक आयोगाकडून परवानगीही घेतली होती का? तसे नसेल तर या नियमाचा भंग होतो अशा आशयाचा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला आहे.

यामुळे विधान परिषदेची मतमोजणी दुपारी पाच वाजता सुरु होणार होती, त्यास विलंब होणार आहे. यामुळे दहा जागांचा निकालदेखील उशिराने लागण्याची शक्यता आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनाच याचे कारण माहिती आहे. निवडणूक अधिकारी यावर निर्णय देण्यास सक्षम आहेत, असे सांगितले. 

राज्यसभेला त्यांनी मतदान केले होते. विधान परिषदेत त्यांच्यामार्फत प्रतिनिधींकडून मतदान करण्यात आले. भाजपाने इतक्या त्रासातून त्यांना मतदानासाठी आणायला नव्हतं पाहिजे. त्यामुळे भाजपानं सहानुभूती दाखवायला हवी होती असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.  या दोन्ही आमदारांच्या वतीने दुसऱ्या माणसाने मतदान केले. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला आहे. त्यांच्यावर निर्णय होईल असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपा