Maharashtra Vidhan Parishad Election Live: उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते निरोप घेऊन सूरतला रवाना, एकनाथ शिंदेंशी बोलणार

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 07:42 AM2022-06-20T07:42:24+5:302022-06-21T13:06:42+5:30

Maharashtra Vidhan Parishad Election Live: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक रंगतदार झाली आणि भाजपानं महाविकास आघाडीला चितपट करत ...

Maharashtra Vidhan Parishad Election 2022 Result Live Updates in Marathi Shiv Sena BJP Congress NCP MVA candidates votes and winners | Maharashtra Vidhan Parishad Election Live: उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते निरोप घेऊन सूरतला रवाना, एकनाथ शिंदेंशी बोलणार

Maharashtra Vidhan Parishad Election Live: उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते निरोप घेऊन सूरतला रवाना, एकनाथ शिंदेंशी बोलणार

googlenewsNext

Maharashtra Vidhan Parishad Election Live: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक रंगतदार झाली आणि भाजपानंमहाविकास आघाडीला चितपट करत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. तर काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार असलेले चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला धक्का सहन करावा लागला आहे. तर भाई जगताप दुसऱ्या फेरीत निवडून आले आहेत. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवर विजयी झाला. पण यात भाजपाच्या उमेदवारांनी सर्वाधिक मतं घेत महाविकास आघाडीला 'जोर का झटका' दिला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता नाराजीनाट्य सुरू झालं आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election Live Updates:

LIVE

Get Latest Updates

01:40 PM

दुपारी दोन वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद

राज्यात शिवसेनेच्या गोटात मोठ्या घडामोडी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद होत आहे. 

01:06 PM

उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते सूरतला रवाना

एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते सूरतला रवाना होणार असल्याची माहिती. सूरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट गेणार

12:32 PM

एकनाथ शिंंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी सुरक्षेत वाढ

12:20 PM

महाराष्ट्रात भूकंप, दिल्लीत मोठ्या घडामोडी

महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला असताना आता दिल्लीतही मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पोहोचले आहेत. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील पोहोचणार आहेत. 

12:10 PM

...तर नक्कीच विचार करू- चंद्रकांत पाटील

एकनाथ शिंदे जुने सहकारी आहेत आणि त्यांनी जर सत्तास्थापनेसंदर्भात कोणताही प्रस्ताव दिला तर भाजपा नक्कीच त्याच विचार करेल. आम्ही काही भजनी मंडळी नाही. आम्ही राजकीय पक्ष आहोत, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 

11:31 AM

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर यांचाही गुजरातेत गेलेल्या आमदारांमध्ये समावेश. 

11:30 AM

उस्मानाबादचे शिवसेनेचे दोन आमदार नॉट रिचेबल

उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार तानाजी सावंत हे दोघेही नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

11:27 AM

एकनाथ शिंदेंशी संपर्क झाल्याचा राऊतांचा दावा

एकनाथ शिंदे महाराष्ट्रात नाहीत. ते सूरतमध्ये असल्याची माहिती आहे. त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. काही आमदार नाराज असतीलही पण सर्व नाराजी दूर होईल, असं संजय राऊत म्हणाले. 

11:21 AM

एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 'ही' सात कारणं ठरली महत्वाची, क्लिक करा आणि वाचा...

10:02 AM

कोल्हापूर : मी नाराज नाही, आणि मुंबईला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली असून आम्ही सर्व जण मुंबईला आता रवाना होत असल्याचे आमदार आबिटकर यांचे लहान बंधू प्रा.अर्जुन आबिटकर यांनी स्पष्ट केले..

09:31 AM

एकनाथ शिंदे १२ वाजता भूमिका मांडणार

शिवसेनेचे नाराज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे दुपारी १२ वाजता गुजरातमधूनच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

09:10 AM

संजय राऊतांचा दिल्ली दौरा रद्द

एकनाथ शिंदे यांच्यासह ११ आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली असल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे.

08:47 AM

एकनाथ शिंदे सूरतच्या मेरेडियन हॉटेलमध्ये

एकनाथ शिंदेंसह ११ आमदार सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलला गुजरात पोलिसांनी वेढा दिला असून गुजरात भाजपाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केल्याची माहिती. 

07:47 AM

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल!

विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर काल संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासह १२ आमदारांशी संपर्क होऊ शकत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेनं बोलावलेल्या आजच्या बैठकीला ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

10:56 PM

लोकाभिमुख सरकार येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार - देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लोकाभिमुख सरकार येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

10:53 PM

टिळक आणि जगताप यांचा विजयाला हातभार - देवेंद्र फडणवीस

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी विजयाला हातभार लावला. त्यांचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

10:53 PM

काँग्रेसपेक्षा आमच्या उमेदवाराला जास्त मते मिळाली - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीत मोठा गोंधळ आहे. समन्वय नाही. आमच्या पाचव्या उमेदवाराला मते मिळतील असा विश्वास होता. काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मते आमच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली.

10:52 PM

विधान परिषदेच्या निवडणुकीत १३४ मते मिळाली - देवेंद्र फडणवीस

राज्यसभा निवडणुकीत १२३ मते घेतली होती विधान परिषदेच्या निवडणुकीत १३४ मते घेतली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

10:51 PM

अत्यंत आनंदाची गोष्ट - देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

10:42 PM

भाजपचे प्रसाद लाड विजयी

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले असून, त्यांना २८ मते मिळाली
 

10:39 PM

काँग्रेसला मोठा धक्का; भाई जगताप विजयी, तर चंद्रकांत हंडोरे पराभूत

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून, चंद्राकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.

10:37 PM

सरकार म्हणून विचार करण्याची गरज - बाळासाहेब थोरात

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, तीन मते फुटल्याचे समोर येत आहे. यावर, सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे. आमच्याच पक्षाची मते फुटल्याने इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. आत्मपरिक्षण करणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

10:34 PM

दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू; काँग्रेसचं टेन्शन वाढलं!

विधान परिषद निवडणूक निकालातील पहिल्या पसंतीचा निकाल आल्यानंतर आता दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

09:54 PM

महाविकास आघाडीची २१ मते फुटल्याची प्राथमिक माहिती

महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीची पहिल्या पसंतीची २१ मते फुटल्याचे सांगितले जात आहे.

09:43 PM

काँग्रेसचे भाई जगताप यांचं टेन्शन वाढलं

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे आणि भाजपचे प्रसाद लाड यांचा निकाल येणे अद्याप बाकी आहे. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

09:41 PM

काँग्रेसला मोठा धक्का; ४४ पैकी ३ मते फुटली

विधान परिषद निवडणुकीचे बहुतांश निकाल हाती आले असून, काँग्रेसची ३ मते फुटल्याची माहिती देण्यात आली आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

09:33 PM

भाजपला १३३ मते मिळाली

भाजपच्या उमेदवारांना १३३ मते मिळाल्याची माहिती भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली. प्रवीण दरेकर यांना २९, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना प्रत्येकी ३० तर उमा खापरे यांना २८ मते मिळाली असून, प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते मिळाल्याचे भातखळकर यांनी सांगितले. 

09:30 PM

काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे उमेदवार वेटिंगवर

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना १९ आणि चंद्रकांत हंडोरे यांना २२ मते मिळाली आहे. विजयासाठी मतांचा कोटा २५.७१ असल्याने अद्याप त्यांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.

09:22 PM

काँग्रेसच्या उमेदवारांच्या निकालाबाबत अद्यापही संभ्रम

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपचे चार उमेदवार विजयी झाले असले तरी, काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा निकाल अद्याप आलेला नाही.

09:19 PM

विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवारी विजयी

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले.

09:17 PM

शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांचा विजय

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

09:17 PM

निकाल येण्यास सुरुवात; प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांचा विजय

विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि भाजपचे राम शिंदे यांचा विजय झाल्याचे सांगितले जात आहे. 

09:13 PM

एकनाथ खडसे आणि राम शिंदे विजयी

विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि भाजपचे राम शिंदे यांचा विजय झाल्याचे सांगितले जात आहे. 

08:57 PM

मतमोजणी पुन्हा थांबली; मत बाद केल्याप्रकरणी भाजप केंद्रीय आयोगाकडे दाद मागणार

रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांचे मत बाद केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने यावर आक्षेप घेतला असून, भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करत धाव घेतली आहे. 

08:52 PM

थोड्याच वेळात विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल अपेक्षित

मतदानासह मतमोजणी प्रक्रियेत महाविकास आघाडी आणि भाजपने आक्षेप घेतल्यानंतर आता या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, थोड्याच वेळात पहिला निकाल येणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. 

08:48 PM

मते बाद झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक मत बाद झाल्याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

08:47 PM

शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराला ३५ मते दिली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या आमदारांनी पहिल्या उमेदवाराला ३५ मते दिली आहे. तर, दुसऱ्या उमेदवाराला २९ मते देण्यात आली. याचा फायदा थेट काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना होणार असल्याचे म्हटले जात आहे.

08:44 PM

पहिल्या पसंतीचा कोटा बदलला

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक मत बाद ठरवण्यात आल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी आता उमेदवाराला २५.७१ चा नवा कोटा निश्चित करण्यात आला आहे. 

08:38 PM

भाजप आणि राष्ट्रवादीची मते बाद

राष्ट्रवादी आणि भाजपने आक्षेप घेतलेली दोन्ही मते बाद करण्यात आली आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय. पुन्हा मतमोजणीला सुरुवात

08:36 PM

भाजपच्या उमा खापरे यांच्या मतावरही आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतल्यानंतर आता भाजपच्या उमेदवारी उमा खापरे यांच्या कोट्यातील मतावर आक्षेप घेण्यात आला आहे. 

08:18 PM

भाजपाने आक्षेप घेतलेलं मत बाजुला ठेवलं 
 

08:06 PM

मत बाद करण्यावरून भाजपा आणि मविआमध्ये खडाजंगी
 

08:00 PM

रामराजेंच्या कोट्यातील एक मत बाद, मतपत्रिकेच्या छाननीत एक मत बाद झाल्याची माहिती
 

07:53 PM

आम्हाला विजयाची खात्री, नाना पटोले पळ काढणारा माणूस नाही - नाना पटोले
 

07:53 PM

भविष्यवाणी म्हणून सांगतोय, भाजपाचे ४ आणि मविआचे ६ विजयी होणार - बच्चू कडू
 

07:51 PM

नाना पटोले नागपूरकरिता रवाना... काँग्रेसचा उमेदवार पराभवाची निश्चिती - अनिल बोंडे

07:42 PM

महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील - बाळासाहेब थोरात 
 

07:04 PM

शिवसेनेकडून अरविंद सावंत मतमोजणीच्या ठिकाणी तर राष्ट्रवादीकडून राजेश टोपे
 

06:59 PM

विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

06:43 PM

केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेल्या  प्राधान्यक्रमानुसारच उमेदवारांना मतदान, प्रसाद लाड हेच पाचव्या क्रमांकाचे उमेदवार - भाजपा
 

06:32 PM

उमेदवारांचा प्राधान्यक्रम बदलला नाही, भाजपाचं स्पष्टीकरण
 

06:30 PM

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील - संजय पवार
 

06:20 PM

भाजपाने दोन उमेदवारांची गंभीर अवस्था असताना त्यांना पुण्याहून बोलावलं हे असंवेदनशील - जयंत पाटील

केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देतं बघू, खरं म्हणजे ते आजारी असताना त्यांना बोलावणं हे दुर्दैवी आहे. मागच्या वेळी त्यांनी आक्षेप घेतला तो वेळकाढूपणा नव्हता का? आम्ही काही केलं तर वेळकाढूपणा. भाजपाने या दोन उमेदवारांची गंभीर अवस्था असताना त्यांना पुण्याहून बोलावलं हे असंवेदनशील आहे - जयंत पाटील 
 

06:17 PM

लागली पैज! प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील, दरेकरांनी स्वाक्षरी करून दिला कागद

06:13 PM

राज्य निवडणूक आयोगाने निर्णय दिला तरी देखील मत मोजणी प्रक्रिया सुरू होणार नाही.


 

05:55 PM

निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळल्यानंतर आता काँग्रेस कोर्टात जाणार
 

05:45 PM

विधानभवन परिसरात भाजपा-शिवसेनेचे आमदार आमने सामने, जोरदार घोषणाबाजी सुरू
 

05:30 PM

काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला, आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

05:28 PM

प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यामध्ये प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे. प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील असं म्हटलं आहे. दरेकरांनी स्वाक्षरी करून बनसोडे यांना पेपर दिल्याची माहिती मिळत आहे. 

05:23 PM

मला फक्त काँग्रेसचे नेते विधानसभेत भेटले - हितेंद्र ठाकूर

मला फक्त काँग्रेसचे नेते विधानसभेत भेटले. तुमचं फुटेज बघा आधी भाजपा आलं नंतर काँग्रेस नेते आले. क्षितीज मेडिकल कारणामुळे परदेशात होते. राजकीय मित्रांच्या आग्रहामुळे क्षितीज डायरेक्ट घरी जाण्याआधी एअरपोर्टवरून विधानभवनात आले. 
 

05:20 PM

मी कोणावरही नाराज नाही, सगळे मला भेटले - हितेंद्र ठाकूर

मी कोणावरही नाराज नाही, सगळे मला भेटले, विनंती केली. लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार मी बजावला आहे - हितेंद्र ठाकूर 
 

05:18 PM

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता

05:12 PM

काँग्रेसनं असंवेदनशीलतेचा कळस गाठला - देवेंद्र फडणवीस

काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसनं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 

04:58 PM

काँग्रेसचे आरोप बेकायदेशीर, परवानगी घेऊनच मतदान केलं - संजय कुंटे
 

04:51 PM

एकनाथ खडसेंच्या समर्थकांची जोरदार घोषणाबाजी, विधानभवन परिसरात खडसे समर्थक एकवटले
 

04:46 PM

निवडणूक आयोग काँग्रेसच्या या निरर्थक आक्षेपाला दाद देणार नाही अशी अपेक्षा - अतुल भातखळकर

भाजपाच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या अंथरूणाला खिळून असलेल्या आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेऊन काँग्रेसने बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. निवडणूक आयोग काँग्रेसच्या या निरर्थक आक्षेपाला दाद देणार नाही अशी अपेक्षा आहे - भाजपा नेते अतुल भातखळकर
 

04:40 PM

काँग्रेसकडून भाजपाच्या दोन मतांवर आक्षेप - अशोक चव्हाण 
 

04:34 PM

काँग्रेसचे आरोप बेकायदेशीर, परवानगी घेऊनच मतदान केलं - संजय कुंटे
 

04:25 PM

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर घेतला आक्षेप

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली म्हणून काँग्रेसने भाजपाच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. 
 

03:43 PM

२८५ आमदारांचं मतदान पूर्ण

विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

03:37 PM

मलिक, देशमुखांना परवानगी नाकारली

राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेसाठी मतदान करु देण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. कोर्टानं दोघांनाही मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. 

03:31 PM

मतदानाची अखेरची ३० मिनिटं शिल्लक

विधान परिषदेच्या मतदानाची अखेरची ३० मिनिटं शिल्लक असताना अजित पवार, एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानासंदर्भातील सुप्रीम कोर्टात नेमका काय निकाल लागतो याची माहिती घेण्यासाठी तिनही नेत्यांनी मतदान राखून ठेवलं होतं. पण अखेरची ३० मिनिटं शिल्लक राहिल्यानं मतदानासाठी तिघंही पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे. 

03:24 PM

विधान सभेत भेटीगाठींचा जोर वाढला

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात भेटीगाठींचा जोर वाढला आहे. बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकूडन अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आपली मतं अजूनही राखून ठेवली आहेत. 

02:30 PM

हितेंद्र ठाकूर विधान भवनात पोहोचले, काँग्रेस नेत्यांनी केलं 'वेलकम'

बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर विधान भवनात पोहोचले आहेत. बहुजन विकास आघाडीची तीन मतं कुणाला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. हितेंद्र ्ठाकूर आणि त्यांच्या समवेत असलेल्या दोन आमदारांचं काँग्रेस नेते विश्वजित कदम, झिशान सिद्दिकी आणि अमर राजूरकर यांनी 'वेलकम' केलं

01:49 PM

दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी

विधान परिषद निवडणुकीत दुपारी १ वाजेपर्यंत २४६ आमदारांनी मतदान केलं आहे, अजूनही ३९ आमदारांचं मतदान शिल्लक आहे.

01:11 PM

आगामी मुख्यमंत्री प्रहार संघटनेचाच असेल- बच्चू कडू

येणारा काळ अपक्ष आमदारांचाच असणार आहे याचा धमाका तुम्हाला आजच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं महत्व वाढलं आहे. सर्वांना त्यांचं महत्व लक्षात येऊ लागलं आहे. आगामी मुख्यमंत्री प्रहार संघटनेचाच असेल, असं विधान प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

01:04 PM

बावनकुळेंनी अजित पवारांच्या भेटीचं कारण सांगितलं...

भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचं मतदान सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतल्यानं विविध चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. नागपुरातील एक काम होतं आणि त्याची माहिती अजित पवार यांना द्यायची होती त्यामुळे त्यांची भेट घेतली असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं आहे. 

12:53 PM

चंद्रशेखर बावनकुळे पोहोचले अजित पवारांच्या कार्यालयात

भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधान भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पोहोचले आहेत. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होत आहे आणि ही भेट नेमकी कशासाठी अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत. या भेटीत राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

12:50 PM

रवी राणा मतदानासाठी पोहोचले

आमदार रवी राणा अखेर मतदान करण्यासाठी विधान भवनात पोहोचले आहेत. "मला मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने पोलिसांकरवी प्रयत्न केले. त्यामुळे मी मुंबईबाहेर होतो. आज मी मतदानासाठी येथे पोहोचलो आहे आणि भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे", असं रवी राणा म्हणाले.

12:31 PM

दुपारी १२ वाजेपर्यंत २०३ आमदारांचं मतदान पूर्ण

विधान परिषदेच्या मतदानात दुपारी १२ वाजेपर्यंत २०३ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. यात भाजपाच्या सर्व १०४ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांचं मतदान झालं आहे. 

11:51 AM

राज्यसभेपेक्षा १० पट जास्त परिस्थिती विधान परिषदेच्या निकालात दिसेल- चंद्रशेखर बावनकुळे

"राज्यात सरकार कसं चाललंय हे सर्व आमदार पाहात आहेत. भाजपाचं सरकार होतं त्यावेळी आमदारांना व्यवस्थित निधी मिळत होता. पण आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे अनेक जण नाराज आहेत. भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत याचा विश्वास आम्हाला आहे. राज्यसभेपेक्षा १० पटीनं जास्त परिस्थिती आजच्या निकालात तुम्हाला पाहायला मिळेल", असं भाजपा नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

11:35 AM

भाजापाचं गर्व हरण होण्याचा आजचा दिवस- नाना पटोले

ज्यांचा काही दिवसांपासून गर्व वाढला आहे, त्यांचा गर्व हरण होण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार बहुमताने निवडून येतील, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. 

11:20 AM

मुख्यमंत्र्यांची रणनिती

राज्यसभेला झालेल्या चुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष काळजी घेतली आहे. शिवसेनेच्या आमदारांचे पाच-पाच जणांचे गट तयार करण्यात आले असून स्वत: मुख्यमंत्री या आमदारांच्या गटांची भेट घेऊन त्यांना मतदानाबाबत मार्गदर्शन करत आहेत. 

11:16 AM

राष्ट्रवादीच्या खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे विधान भवनात पोहोचताच त्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात पोहोचल्या आहेत. 

11:02 AM

नवाब मलिक, अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात

विधान परिषदेला मतदान करु देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि नेते अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात धाव, आज तातडीनं सुनावणी होणार का याकडे सर्वांचं लक्ष

10:49 AM

शिवसेना आमदारांची दुसरी बस देखील विधान भवनात पोहोचली

शिवसेना आमदारांची दुसरी बस देखील विधान भवन परिसरात पोहोचली आहे. पाच आमदारांचा एक गट असं शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटत आहेत. त्यानंतर मतदान करत आहेत.

10:36 AM

उद्धव ठाकरे विधानभवनात पोहोचले, पण शिवसेना आमदार अडकले

10:32 AM

फडणवीस घेत आहेत प्रत्येक आमदाराची भेट

भाजपाचे आमदार विधान भवनात पोहोचताच प्रत्येक आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. फडणवीस स्वत: प्रत्येक भाजपा आमदाराला मतदानात कोणता पसंती क्रम द्यायचा आहे याचं मार्गदर्शन करत आहेत. 

10:22 AM

शिवसेनेच्या आमदारांची बस विधान भवनात अखेर पोहोचली

शिवसेनेच्या आमदारांची बस वाहतूक कोंडीत अडकली होती. नुकतीच ही बस विधान भवन परिसरात पोहोचली आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना आमदार विधान भवनात पोहोचले आहेत.

09:47 AM

भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांचं सूचक विधान

"काळ आला होता भाऊ किंवा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा...", असं सूचक ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे.

09:37 AM

राज्य सभेत जे काही झालं ते पुन्हा होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने  काळजी घेतली आहे, रोहीत पवार पवार यांचं विधान

09:18 AM

महाविकास आघाडीची एकजूट किती आहे हे संध्याकाळी निकालात दिसेल- संजय राऊत

"महाविकास आघाडीत पूर्णपणे समन्वय असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार आणि काँग्रेसचे नाना पटोल, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यात उत्तम संवाद आहे. सारी गणितं ठरलेली आहेत आणि याचा निकाल संध्याकाळी तुम्हाला दिसेल"

- संजय राऊत (शिवसेना खासदार)

09:15 AM

विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी समाजवादी पार्टीचे दोन आमदार अबू आझमी आणि रईस शेख विधान भवन येथे दाखल 

09:10 AM

भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिलं पहिलं मत

विधान परिषदेच्या निवडणूक मतदानाला सुरुवात झाली असून पहिलं मत देण्याचा मान भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांना देण्यात आला आहे.

09:08 AM

मतदानाला सुरुवात

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह भाजपाचे आमदार विधान भवनात पोहोचले आहेत. 

09:05 AM

सगळी गणितं चांगल्याप्रकारे सोडवलेली आहेत- भाई जगताप

चांगल्या प्रकारे गणितं सोडवलेली आहेत. त्याचा रिझल्ट तुमच्यासमोर येईल आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजय झालेले असतील. महाराष्ट्राची ही संस्कृती याआधी नव्हती. एकमेकांचा आदर ठेवला जायचा. आता खालच्या दर्जाचं राजकारण सुरू आहे, असं काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप म्हणाले.

08:58 AM

शिवसेनेचं ठरलं, आपली ४ मतं काँग्रेसला देणार

काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची चार ते पाच मतं काँग्रेसला देणार असल्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.

08:55 AM

आमदार क्षितीज ठाकूर मुंबईत परतले

बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर आपल्या एका नातेवाईकाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यामुळे ते मतदानाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा होती. पण आज मतदानाच्या दिवशी ते मुंबईत पोहोचले आहेत. ते आज दुपारी मतदानाला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

08:51 AM

शिवसेनेचे आमदार विधान भवनाकडे रवाना

शिवसेनेचे आमदार एका बसमधून विधान भवनाकडे रवाना झाले आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील आमदारांसोबत बसमध्ये उपस्थित आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेचे आमदार विधान भवनाकडे रवाना झाले आहेत.

08:18 AM

मविआचा एक उमेदवार पडणार- चंद्रकांत पाटील

आम्हाला आमच्या विजयाचा विश्वास आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल पण कोणते ते माहित नाही, असं सूचक विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

08:15 AM

भाजपा आमदारांची पहिली बस विधान भवनात पोहोचली

भाजपा आमदारांची पहिली बस विधान भवनात पोहोचली असून चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात आमदार मतदानासाठी विधान भवनात पोहोचले आहेत. 

08:15 AM

भाई जगताप यांना निवडून येण्याचा विश्वास

मला खात्री आहे राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जे झालं ते आता होणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी व्यक्त केला आहे.

08:08 AM

आम्हालाच मतदान होणार- चंद्रकांत पाटील

पाच वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या कामामुळे आम्हाला मतदान होमार आहे. देश प्रथम, पक्ष आणि नंतर आपण असं आमचं धोरण आहे, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

08:01 AM

भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड सिद्धिविनायकाच्या चरणी...

07:57 AM

शिवसेनेत नाराजीची चर्चा

राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना आमदार विधान परिषदेत निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. काँग्रेसचे दुसरी जागा धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी १० मतांची गरज आहे. शिवसेना आमदार आदेशाचं पालन करणार का? हे पाहावं लागणार आहे.

07:46 AM

आमदार मुक्ता टिळक मुंबईकडे रवाना

कर्करोगाशी झुंज देत असतानाही पुण्याच्या कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. 

07:45 AM

आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून निवडणूक रंगतदार होणार आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Parishad Election 2022 Result Live Updates in Marathi Shiv Sena BJP Congress NCP MVA candidates votes and winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.