शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारात महाराष्ट्र अव्वलच

By admin | Updated: August 1, 2014 11:33 IST

देशात रोजगार असलेल्यांची संख्या गेल्या आठ वर्षांमध्ये २०१३ पर्यंत ३४.३५ टक्क्यांनी वाढून १२.७७ कोटी झाली आहे.

नवी दिल्ली : देशात रोजगार असलेल्यांची संख्या गेल्या आठ वर्षांमध्ये २०१३ पर्यंत ३४.३५ टक्क्यांनी वाढून १२.७७ कोटी झाली आहे. काल प्रसिद्ध झालेल्या सहाव्या आर्थिक गणनेतील आकडेवारीनुसार, रोजगारवाढीचा वार्षिक दर या काळात ४ टक्के एवढा होता. या काळात वार्षिक लोकसंख्यावाढीचा दर २ टक्के एवढा होता.देशातील एकूण रोजगारांपैकी ११.२६ टक्के रोजगार एकट्या महाराष्ट्रात आहेत. कामावर असलेल्या लोकांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. यानंतर उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. आर्थिक गणनेत प्रथमच यावेळी हातमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचा समावेश करण्यात आला. देशभरात या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे प्रमाण ३.७५ टक्के आहे.२००५ च्या तुलनेत शहरी भागात रोजगार २०१३ च्या तुलनेत ३७.४६ टक्क्यांनी वाढून ६.१४ कोटी झाले. दुसरीकडे ग्रामीण भागात ३१.५९ टक्क्यांनी वाढून ६.६२ कोटी राहिले. केंद्रशासित प्रदेशांत २०१३मध्ये दिल्लीत सर्वाधिक २९.८४ लाख नोकरदार आहेत. यानंतर २.३८ लाख कर्मचाऱ्यांसह चंदीगडचे स्थान राहिले. पुडुचेरीत २.१७ लाख कर्मचारी होते.२०११च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या १२१ कोटींहून अधिक होती. आर्थिक गणनेत कृषी, लोक प्रशासन, संरक्षण आणि अनिवार्य सामाजिक सुरक्षा सेवा यांचा समावेश करण्यात आला नाही. या क्षेत्रांचा यात समावेश केल्यास रोजगारवाढीचे प्रमाण घटेल. २००५ ते २०१३ या काळात संस्था किंवा कंपन्यांची संख्या ४१.७३ टक्क्यांनी वाढून ५.८४ कोटी राहिली. यामध्ये ६० टक्के आस्थापने ग्रामीण भागात आहेत.रोजगारवाढीत उत्तर प्रदेशची बाजी उत्तर प्रदेशात याच काळात रोजगारवाढीचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक नोंदले गेले. लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगारमध्ये मणिपूर, आसाम आणि सिक्कीम यांच्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. यात गुजरात नवव्या स्थानावर आहे. रोजगार स्थितीबाबत विचारले असता, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे चेअरमन प्रणव सेन यांनी सांगितले की, आठ वर्षांत रोजगारामध्ये ३४ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली. म्हणजेच वार्षिक ४ टक्क्यांहून अधिक दराने रोजगारात वाढ झाली. लोकसंख्येत वार्षिक २ टक्के दराने वाढ नोंदली. (लोकमत न्यूज नेटवर्क)