७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:54 IST2025-06-09T10:53:30+5:302025-06-09T10:54:23+5:30

Maharashtra FDI News: महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये झालेली लक्षणीय सुधारणा राज्यासाठी अतिशय फायद्याची ठरली आहेत. त्यामुळेच परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.

Maharashtra tops in FDI in 7 years, highest foreign investment in the state; Improvements in infrastructure prove to be of great benefit | ७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

- चंद्रकांत दडस
मुंबई - महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये झालेली लक्षणीय सुधारणा राज्यासाठी अतिशय फायद्याची ठरली आहेत. त्यामुळेच परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या सात वर्षात महाराष्ट्रात ६ लाख ९७ हजार ३०४ कोटी रुपये थेट परकीय गुंतवणूक आल्याचे उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अहवालातून समोर आले.

महाराष्ट्राने सात वर्षांत सर्वाधिक ३१% एफडीआय राज्यात आणण्यात यश मिळवले आहे. शिवाय गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाटा ५१ टक्के राहिला. एप्रिल-मार्च २०२४-२५ दरम्यान महाराष्ट्राने सर्वाधिक १९.६ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आणली. कर्नाटकला ६.६२ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक मिळाली.

- २२लाख कोटी रुपये इतकी थेट परकीय गुंतवणूक गेल्या ७ वर्षांत भारतात आली आहे.
- ४.७७ लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक २००० ते २०२५ दरम्यान भारतात झाली आहे.

महाराष्ट्रात किती परकीय गुंतवणूक? 
२०१९    २५,९५७
२०२०    १,४७,८६७
२०२१    १,००,१७२
२०२२    १,३५,४९३
२०२३    १,३२,३०३

सर्वाधिक एफडीआय करणारे १० देश
(एप्रिल २००० ते मार्च २०२५, गुंतवणूक कोटीत)
सिंगापूर    १२,१८,१०७.८२
अमेरिका    ४,९३,५४९.७८
नेदरलँड    ३,६२,९८८.१७
जपान    २,८३,३७०.४२
ब्रिटन    २,१०,०४८.६३
युएई    १,६७,७२४.६५
केमन आयलंड्स    १,११,०४०.२३
जर्मनी    ९१,८४६.८८
सायप्रस    ८९,५३८.३९
फ्रान्स    ७५,७७७.४१

Web Title: Maharashtra tops in FDI in 7 years, highest foreign investment in the state; Improvements in infrastructure prove to be of great benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.