एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 08:29 PM2023-09-08T20:29:32+5:302023-09-08T20:30:43+5:30

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra ST DA News : Good news for ST employees! 4 percent increase in dearness allowance | एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गणेशोत्सवापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के होणार आहे. 

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 90 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता 38 टक्के इतकाच दिला जातो. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, असा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केल्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
 

Web Title: Maharashtra ST DA News : Good news for ST employees! 4 percent increase in dearness allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.