सोलापूर – कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना आता राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ७ जून पासून महाराष्ट्रात ५ टप्प्यात अनलॉक उठवलं जाणार आहे. परंतु तत्पूर्वी स्थानिक प्राधिकरणाला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने सुधारित आदेश काढले आहेत.
सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवाशंकर यांनी आदेशात म्हटलंय की, मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आणि देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ७ जून २०२१ पासून सकाळी ७ ते पुढील आदेश होईपर्यंत शहरातील काही निर्बंध अंशत: हटवण्यात आले आहेत.
सोलापूरात काय सुरू आणि काय बंद याबाबत जाणून घ्या
| अनु क्रमांक | उपक्रम | वेळ |
| १ | अत्यावश्यक सेवेतील दुकाने | नियमितप्रमाणे |
| २ | बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकानं | नियमितप्रमाणे |
| ३ | मॉल्स, थिअटर्स, नाट्यग्रृह, सिंगल स्क्रीन | ५० टक्के क्षमतेने |
| ४ | उपहारगृहे(रेस्टॉरंट) | ५० टक्के क्षमतेने |
| ५ | सार्वजनिक ठिकाणं, मोकळी मैदाने | नियमितप्रमाणे |
| ६ | खासगी कार्यालये | नियमितप्रमाणे |
| ७ | खासगी आणि सरकारी कार्यालये | १०० टक्के क्षमतेने |
| ८ | क्रिडा | पहाटे ५ ते सकाळी ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ इनडोअर गेम्स, आऊटडोअर गेम्स पूर्ण दिवस, परंतु प्रेक्षकांना परवानगी नाही |
| ९ | नेमबाजी | नियमितप्रमाणे |
| १० | सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रम | ५० टक्के क्षमतेने |
| ११ | विवाह समारंभ | जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी |
| १२ | अंत्यसंस्कार | जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी |
| १३ | बैठका, निवडणूका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था बैठका | ५० टक्के क्षमतेने |
| १४ | बांधकाम | नियमितप्रमाणे |
| १५ | कृषी विषयक | नियमितप्रमाणे |
| १६ | ई कॉमर्स वस्तू आणि सेवा | नियमितप्रमाणे |
| १७ | जमावबंदी, संचारबंदी | जमावबंदी कायम असेल |
| १८ | जीम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सेंटर | ५० टक्के क्षमतेने परंतु वेळ निश्चित दिल्यानुसार |
| १९ | सार्वजनिक वाहतूक सेवा(बस) | १०० टक्के क्षमतेने परंतु उभे प्रवासी घेण्यास बंदी |
| २० | मालवाहतूक, एकावेळी ३ जणांना परवानगी | नियमितप्रमाणे |
| २१ | खासगी वाहनाने, लांबचा प्रवास, आंतरजिल्हा प्रवास | नियमितप्रमाणे सुरू राहील परंतु पाचव्या टप्प्यातून येणाऱ्यांना ई पास बंधनकारक |
| २२ | उत्पादन क्षेत्रे निर्यात करणारे उद्योग | नियमितप्रमाणे |
| २३ | इतर सर्व प्रकारचे उद्योग | नियमितप्रमाणे |