Maharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 21:16 IST2021-08-01T21:16:08+5:302021-08-01T21:16:31+5:30

Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ४७९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर १५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Maharashtra sees 6479 new COVID19 cases 157 deaths 4110 recoveries | Maharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू!

Maharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू!

Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ४७९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर १५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसंच गेल्या २४ तासांत ४११० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 

राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येचा आकडा आता ६३,१०,१९४ वर पोहोचला असून आतापर्यंत ६०,९४,८९६ जणांना कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ७८ हजार ९६२ सक्रीय रुग्ण आहेत. तर रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९६.५९ टक्क्यांवर आहे. मृत्यूदर २.१ टक्के इतका आहे. 

मुंबईत आज ३२८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. कालच हाच आकडा ३४६ इतका होता. मुंबईतील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता ७ लाख ३५ हजार १०७ इतका झाला आहे. तर आतापर्यंत १५ हजार ८९९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Maharashtra sees 6479 new COVID19 cases 157 deaths 4110 recoveries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.