Coronavirus: राज्यात दिवसभरात १४ हजार ७३२ जण कोरोनामुक्त; २८ जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 09:58 PM2021-06-14T21:58:06+5:302021-06-14T21:59:34+5:30

Coronavirus: राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.५५ टक्क्यांवर गेला आहे.

maharashtra reports 8129 new corona cases and 200 deaths in last 24 hours | Coronavirus: राज्यात दिवसभरात १४ हजार ७३२ जण कोरोनामुक्त; २८ जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही

Coronavirus: राज्यात दिवसभरात १४ हजार ७३२ जण कोरोनामुक्त; २८ जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही

Next
ठळक मुद्देराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवरया जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही मुंबईत रुग्णदुपटीचा कालाावधी ६७२ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.५५ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8129 new corona cases and 200 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ०८ हजार १२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ००३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ४७ हजार ३५४ इतकी आहे.

मुंबईकरांना मोठा दिलासा

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५२९ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७२५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २०२ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १५ हजार ५५० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ६७२ दिवसांवर गेला आहे. 

या जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही 

सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील २८ जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. ठाणे जिल्हा, ठाणे शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, पालघर, वसई-विरार शहर, मालेगाव शहर, अहमदनगर शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, जळगाव शहर, पिंपरी चिंचवड शहर, सोलापूर शहर, जालना जिल्हा, परभणी शहर, लातूर शहर, लातूर जिल्हा, नांदेड शहर, अमरावती शहर, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

दिलासा! धारावीत शून्य रुग्णांची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८२ लाख १५ हजार ४९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख १७ हजार १२१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ९ लाख ४९ हजार २५१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ५ हजार ९९७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 
 

Web Title: maharashtra reports 8129 new corona cases and 200 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.