Coronavirus : राज्यातून पुन्हा धडकी भरवणारी रुग्णसंख्या; चोवीस तासांत ६८,६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 09:27 PM2021-04-18T21:27:57+5:302021-04-18T21:31:03+5:30

Coronavirus : मुंबईत गेल्या चोवीस तासांत ८,४७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Maharashtra reports 68631 fresh COVID cases 45654 discharges 503 deaths in 24 hours | Coronavirus : राज्यातून पुन्हा धडकी भरवणारी रुग्णसंख्या; चोवीस तासांत ६८,६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus : राज्यातून पुन्हा धडकी भरवणारी रुग्णसंख्या; चोवीस तासांत ६८,६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Next
ठळक मुद्देमुंबईत गेल्या चोवीस तासांत ८,४७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंदराज्यात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले असले तरी सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 





राज्यात सध्या ६ लाख ७० हजार ३८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६० हजार ४७३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतही गेल्या चोवीस तासांमध्ये ८ हजार ४७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८ हजार ०७८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत ४ लाख ७८ हजार ०३९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा दरही ४५ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या ८७ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Web Title: Maharashtra reports 68631 fresh COVID cases 45654 discharges 503 deaths in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.