चोवीस तासांत राज्यात ६७,०१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ६२ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 09:33 PM2021-04-22T21:33:21+5:302021-04-22T21:36:16+5:30

मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

Maharashtra reports 67013 new COVID19 cases 62298 recoveries in last 24 hours | चोवीस तासांत राज्यात ६७,०१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ६२ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

चोवीस तासांत राज्यात ६७,०१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ६२ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देराज्यात ६२ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्तमुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,०१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर कोरोनामुळे ५६८ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात सात लाखांच्या जवळपास अॅक्टिव्ह केसेस आहेत. 

राज्यात कोरोनाचा कहर अद्यापही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या ६७,०१३ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे ६२,२९८ जण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनामुळे ५६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ४०,९४,८४० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण ३३,३०,७४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,९९,८४० जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८१.३४ टक्क्यांवर आला आहे. 





मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

मुंबई गेल्या चोवीस तासांमध्ये ७,४१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. मुंबईत गेल्या चोवीस तासांत ८,०९० जण कोरोनामुक्त झाले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ८३ हजार ९५३ अॅक्टिव्ह केसेस आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस इतका आहे. 

Web Title: Maharashtra reports 67013 new COVID19 cases 62298 recoveries in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.