शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 11:52 IST

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ७६ जणांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असून, लसीकरण झालेल्यांचाही यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देराज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर१० रुग्णांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले होतेया रुग्णांमध्ये ३९ महिलांचा तर ९ लहान मुलांचा समावेश

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरली असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा चिंतेत भर टाकणारा आहे. तसेच जागतिक देशांसह भारतातही कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ७६ जणांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असून, लसीकरण झालेल्यांचाही यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात असून, आतापर्यंत राज्यात ५ डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra reports 10 new cases of corona delta plus total count reach to 76 and 5 dead)

“राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय”; मनसेचा पलटवार

कोरोनाची लस घेतलेल्या रुग्णांनाही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याचे समोर येत आहे. सध्या राज्यात डेल्टा प्लसचे एकूण ७६ रुग्ण आहेत. तर यापैकी लस घेतलेल्या १८ जणांना याची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या १० रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी सहा कोल्हापूर, तीन रत्नागिरी तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण आहे. 

Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार

कोरोना लसीचे दोनही डोस घेतले होते

राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालेल्या एकूण ७६ रुग्णांपैकी १० रुग्णांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले होते, तर १२ लोकांनी लसीचा एक डोस घेतला होता. या रुग्णांमध्ये ३९ महिलांचा तर ९ लहान मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्यात तपासण्या करण्यात येत आहे. राज्यात डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मुंबईत ११, जळगावमध्ये १३, रत्नागिरीत १५, कोल्हापूरमध्ये ०७, ठाण्यात ०६, पुण्यात ०६, रायगडमध्ये ०३, पालघरमध्ये ०३, नांदेडमध्ये ०२, गोंदियात ०२, सिंधुदुर्गमध्ये ०२, तर, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड या ठिकाणी डेल्टाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

दरम्यान, महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. ६९ लाख ९० हजार ९४९ पुणेकरांनी लसीकरणाचा लाभ घेतला. देशातही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला असून, देशभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या सोमवारी ५५ कोटींपलीकडे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रRajesh Topeराजेश टोपेState Governmentराज्य सरकार