शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain Update: पुढचे पाच दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:45 IST

Maharashtra Rain Update: संपूर्ण जून महिन्यात पुरेसा सक्रिय नसलेल्य मान्सूनने गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई - संपूर्ण जून महिन्यात पुरेसा सक्रिय नसलेल्य मान्सूनने गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साठले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, पुढचे पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊत पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्यातील पर्जन्यस्थितीबाबत माहिती देताना हवामान खात्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज मान्सून सक्रिय आहे. आपल्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेला आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वेस्टर्निस्ट आहे. कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशच्या मध्यवर्ती भागावर आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढचे ५ दिवस कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. जयंता सरकार यांनी दिली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे  मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील २० तासांपासून पाऊस सुरू आहे. युद्धपातळीवर दरड बाजूला सारण्याचं काम सुरू आहे. याठिकाणची वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली आहे. चिपळूण परिसरात अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे.

तर आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे हार्बर लाईन आणि मध्य रेल्वे मार्गावरील सर्व ट्रेन्स सुमारे ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावत आहे. ताज्या माहितीनुसार, सध्या लोकल सेवा अद्याप सुरू आहे ही दिलासा देणारी बाब आहे, पण हवामान विभागाने आजही दिवसभर मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दिवसभर पाऊस पडल्यास रेल्वे सेवा बंद होण्याचीही शक्यता आहे. आज ४ वाजता हाय टाईटची परिस्थिती आहे. त्यावेळी जर मुसळधार पाऊस बरसला तर कुर्ला, माटुंगा, सायन, ठाणे यांसारख्या स्टेशनवर ट्रॅकवर पाणी भरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटRainपाऊसweatherहवामान