हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 09:07 IST2025-08-03T09:05:41+5:302025-08-03T09:07:07+5:30
Maharashtra Rain, Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशभरात पुढचे १०-१५ दिवस कसे हवामान असेल याची माहिती दिली आहे.

हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
भर उन्हाळ्यात, मे महिन्यात जी काही पावसाने २०-ट्वेंटीलाही लाजवेल अशी बॅटींग केली, की पुढचे पावसाळ्याचे दोन महिने महाराष्ट्राला म्हणावे तसे पावसाचे दर्शनच झालेले नाहीय. आज पुण्याच्या आकाशात सुर्योदय दिसला आहे. देशाच्या काही भागात जोरदार पाऊस झाला आहे, तर काही भागात थेंब थेंब पडून जात आहे. नाही म्हणायला जुलैच्या शेवटच्या आठड्यात काहीसा मुंबई, पुण्यात पडला आहे. अशातच आता ऑगस्टही कोरडा जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशभरात पुढचे १०-१५ दिवस कसे हवामान असेल याची माहिती दिली आहे. पुढील किमान १० दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील जे मुख्य मान्सूनचा भाग आहेत अशा ठिकाणी पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाही. मान्सूनचा ट्रॅक त्याच्या सामान्य स्थितीवरून उत्तरेकडे सरकला आहे. यामुळे या भागातील मान्सूनची कार्यक्षमता कमकुवत झाल्याचे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जेव्हा मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकतो तेव्हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मध्य भारत आणि महाराष्ट्राकडे येणाऱ्या आर्द्रतेने भरलेल्या वाऱ्यांच्या सामान्य प्रवाहात व्यत्यय येतो. हिमालयाच्या पायथ्याशी ट्रफ गेल्याने उत्तरेकडील मैदाने आणि ईशान्य राज्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे.
१ ऑगस्टपासून मान्सूनने विराम घेतला आहे, महिन्याच्या पहिल्या भागापर्यंत तो तसाच असणार आहे. जुलैच्या उत्तरार्धात मान्सून सक्रीय होता, ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात तो पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.