शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 21:48 IST

Maharashtra Portfolio Allocation News: विधिमंडळाचं हिवाळी आधिवेशन आटोपल्यानंतर आज रात्री राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी होऊन पंधवरडा, तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचं खातेवाटप रखडलं होतं. अखेर विधिमंडळाचं हिवाळी आधिवेशन आटोपल्यानंतर आज रात्री राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. या खातेवाटपामध्ये महायुतीत कळीचा मुद्दा ठरलेलं गृहखातं देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखातं आणि  एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. 

२३ डिसेंबर रोजी लागलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० हून अधिक जागांसह दणदणीत विजय मिळाला होता. मात्र मुख्यमंत्रिपदासह मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असलेल्या सरकारचा शपथविधी लांबला होता. सुरुवातीला केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेअजित पवार यांचाच शपथविधी झाला होता. त्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये महायुतीमधील ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. मात्र हिवाळी अधिवेशनादरम्यान, नवनियुक्त मंत्र्यांचं खातेवाटप होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे संपूर्ण अधिवेशात हे मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणूनच सहभागी झाले होते. अखेर आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्यासह ऊर्जा आणि कायदा व न्याय ही खाती स्वत:कडे ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण खाती देण्यात आली आहे. तर सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन ही खाती देण्यात आली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल, तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास प्रकल्प) हे खातं देण्यात आलं आहे. हसन मुश्रिफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय व्यवहार, गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास प्राधिकरण) आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचं संपूर्ण खातेवाटप पुढील प्रमाणे

१) देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) - गृह, ऊर्जा आणि कायदा व न्याय२) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) - नगरविकास, गृहनिर्माण३) अजित पवार (उपमुख्यमंत्री) - वित्त आणि नियोजन४) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल५)राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)६)हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण७)चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री८)गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन९)गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा१०)गणेश नाईक -  वन११)दादाजी भुसे - शालेय शिक्षण१२)संजय राठोड - माती व पाणी परीक्षण१३)धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण१४)मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन१५)उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा१६)जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल१७)पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन१८)अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण१९)अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय२०)शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय२१)आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान २२)दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय२३)अदिती तटकरे - महिला व बालविकास २४)शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम२५)माणिकराव कोकाटे - कृषी २६)जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज२७)नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन२८)संजय सावकारे - कापड२९)संजय शिरसाट - सामाजिक न्याय ३०)प्रताप सरनाईक - वाहतूक ३१)भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन३२)मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन३३)नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे ३४)आकाश फुंडकर - कामगार ३५)बाबासाहेब पाटील - सहकार ३६)प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री ३७)माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण ३८) आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय ३९) मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा ४०) इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन ४१) योगेश कदम  - गृहराज्य शहर४२) पंकज भोयर - गृहनिर्माण

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार