Disha Salian Case: दिशा सालियानला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन; मनीषा कायंदे म्हणाल्या, राजकीय रंग नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:46 IST2025-03-20T13:45:14+5:302025-03-20T13:46:03+5:30
Maharashtra Politics : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याबाबत तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली आहे.

Disha Salian Case: दिशा सालियानला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन; मनीषा कायंदे म्हणाल्या, राजकीय रंग नाही...
Maharashtra Politics ( Marathi News ) : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेंजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेत केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आरोप सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या आमदारांनी फलक घेऊन आंदोलन केले.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची 'सीबीआय'कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्येत दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलना दरम्यान केली.
"दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का? दबाव टाकला का? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्ष न्याय न मिळाल्याने दिशा सालियन हीचे वडील न्यायालयात गेल्याचे आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या.
संजय गायकवाड यांनी ठाकरेंची पाठराखण केली
आज माध्यमांसोबत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, दिशा सालियान प्रकरणात सीआयडीच्या तपासात राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत नाही, जे तपासात समोर आलंय ते सांगतोय.कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते. कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. पण मागची तीन वर्षे आमचेच सरकार सत्तेवर होते, असंही संजय गायकवाड म्हणाले.