Maharashtra Politics : "एका अदानीसाठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करताहेत"; संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:16 IST2025-06-26T13:11:27+5:302025-06-26T13:16:57+5:30
Maharashtra Politics : वाढवण बंदरासाठी सुरू असलेला हायटाईड ड्रोन सर्व्हे आज पुन्हा सुरू आहे. काल हा सर्व्हे ७० टक्के पूर्ण झाला आहे.

Maharashtra Politics : "एका अदानीसाठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करताहेत"; संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ
Maharashtra Politics ( Marathi News ) : वाढवण बंदरासाठी कालपासून सर्व्हे सुरू झालाआहे. स्थानिकांनी सर्व्हेला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. आज गुरुवारीही या सर्व्हेला सुरुवात झाली आहे. आजही स्थानिकांनी याला विरोध केला असून आज खासदार संजय राऊत एक व्हिडीओ शेअर करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राऊत म्हणाले, 'आज दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचे सर्वेक्षण सुरू आहे, गावकरी त्यांच्या जमिनी द्यायला तयार नाहीत,मरण पत्करू पण जमिनी देणार नाही हा त्यांचा आक्रोश आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
"एका अडानीसाठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करत आहेत आणि हे भंपक लोक आणीबाणी विरुद्ध आंदोलन करतात, असंही राऊत म्हणाले.
आज दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचे सर्वेक्षण सुरू आहे, गावकरी त्यांच्या जमिनी द्यायला तयार नाहीत,मरण पत्करू पण जमिनी देणार नाही हा त्यांचा आक्रोश आहे
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2025
एका अडानी साठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करत आहेत
आणि हे भंपक लोक आणीबाणी विरुद्ध आंदोलन करतात! pic.twitter.com/LhdhFE8ddl
सर्व्हेविरोधात आंदोलन
वाढवण बंदराच्या सर्व्हे विरोधात स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे. स्थानिकांचे जलसमाधी आंदोलन तब्बल अडीच तासानंतर देखील सुरूच आहे. स्थानिकांचा विरोध डावलून जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. काल अपूर्ण असलेला ड्रोन सर्व्हे आज प्रशासनाकडून पूर्ण करण्यात येत आहे. वाढवण बंदर उभारणी विरोधातील स्थानिकांचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेताच बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आल्याचा आरोप करण्यात येत असून पोलीस प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.