Maharashtra Politics ( Marathi News ) :शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात राऊत यांनी अनेक दावे केले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह या दोघांना मदत केली, असे राऊतांनी या पुस्तकात लिहीले आहे. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेली मदतीचा किस्सा लिहिला आहे. संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता. परंतु ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिला. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली. अमित शाह यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे.
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
दरम्यान, या उल्लेखावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेत्यांचा मदत करण्याचा जो स्वभाव आहे, त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही नेत्यांचे पक्ष कसे फोडले आणि माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टाहास केला. हा वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला. म्हणजे उपकाराची फेड ही कशी अपकाराने केली, असा टोलाही खासदार संजय राऊतांनी लगावला. आता भाजपावाल्यांचे एकत होतो. त्यांना काय माहीत आहे? तुम्ही कुठे होता तेव्हा? हा बोलतोय, तो बोलतोय, पोकळ दावे, अरे तुम्हाला काय माहीत आहे? पवारांना भेटा आणि त्यांच्याशी बोला, मी अजून काही लिहिले असते पण हाहाकार माजला असता, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.
"पुस्तकात लिहिलेल्या दोन्ही घटना सत्य आहेत. मी त्यापेक्षाही जास्त लिहू शकतो. पण त्याने फार हाहाकार माजला असता. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळला आहे, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, यापेक्षा असंख्य घटनांचा मी साक्षीदार आहे. तुम्हा सर्वांना हे नाकारता येणार नाही, मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांसोबत राहिलेला माणूस आहे. त्यामुळे यांना अनेकवेळा बाळासाहेबांनी केलेली मदत आणि घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे. पण मी त्या कधीच लिहिणार नाही.