'महाराष्ट्रात मोठी घडामोड घडणार', एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून नाना पटोलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 18:47 IST2026-03-18T18:45:18+5:302026-03-18T18:47:21+5:30

Maharashtra Politics: 'एकनाथ शिंदेंची स्थिती सध्या डळमळीत आहे.'

Maharashtra Politics: 'Big developments will happen in Maharashtra', Nana Patole's big claim on Eknath Shinde's Delhi visit | 'महाराष्ट्रात मोठी घडामोड घडणार', एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून नाना पटोलेंचा दावा

'महाराष्ट्रात मोठी घडामोड घडणार', एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून नाना पटोलेंचा दावा

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ देत एक मोठा दावा केला आहे. बुधवारी (१८ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात काहीतरी मोठी घडामोड घडणार आहे. भाजप देवेंद्र फडणवीसांच्या जागी शिंदेंना मुख्यमंत्री करेल, असे वाटत नसले तरी, सध्याची परिस्थिती पाहता एखादी मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत आहेत, असे पटोले म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, एकनाथ शिंदेंची स्थिती सध्या डळमळीत आहे. भाजपने त्यांना कोणत्या परिस्थितीत टाकले आहे, हे त्यांच्या देहबोली आणि वर्तणुकीतून सर्वांनाच स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या मंत्री आणि आमदारांनाही या गोष्टीची जाणीव होऊ लागली आहे. महाराष्ट्रात सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे; लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवणे कठीण झाले आहे आणि उद्योगधंदेही ठप्प झाले आहेत. सरकार तर आता प्रसारमाध्यमांनाही धमकावत आहे. 

पटोले पुढे म्हणतात, केवळ दिल्लीत जाऊन 'फडणवीस माझ्याशी अपमानास्पद वागणूक देत आहेत' अशा तक्रारी करण्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप फडणवीसांना पदावरून हटवेल, असे मला वाटत नाही. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, एक मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. शिंदेंनी सध्याच्या या परिस्थितीकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पटोले म्हणाले.

Web Title : महाराष्ट्र में बड़ा उलटफेर जल्द: शिंदे की दिल्ली यात्रा पर नाना पटोले का दावा।

Web Summary : नाना पटोले ने एकनाथ शिंदे की दिल्ली यात्रा पर महाराष्ट्र में बड़े राजनीतिक बदलाव की आशंका जताई। उन्होंने कहा कि शिंदे मुश्किल स्थिति में हैं और फडणवीस के प्रतिस्थापन पर संदेह के बावजूद, एक बड़ा बदलाव संभव है।

Web Title : Major political shift in Maharashtra soon: Nana Patole on Shinde's Delhi visit.

Web Summary : Nana Patole claims a significant political event is brewing in Maharashtra due to Eknath Shinde's Delhi visit. He suggests Shinde is in a difficult position and a major change is likely, despite doubts about Fadnavis's replacement.