शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:37 IST

आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे.

मुंबई - शिवसेनेने त्यांचा गटनेता बदलला आहे. उद्या बहुमत चाचणीवेळी व्हिप जारी होईल मग हे प्रकरण कोर्टात आहे. एका रात्रीत राज्यपाल भवनाने बहुमत चाचणीसाठी पत्र दिले. ११ जुलैपर्यंत कोर्टाने म्हणणं मांडण्याची मुदत दिली. मग ४८ तासात बहुमत चाचणी का? हा चमत्कार आहे. लोकशाही, संविधानविरोधी काम राजभवनाकडून केले जाते असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 

नाना पटोले म्हणाले की, शिवसेना कोर्टात गेली आहे. तीच भूमिका काँग्रेसची आहे. सध्या आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. ज्याच्याजवळ बहुमत असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. राज्यपाल भाजपाचा अजेंडा महाराष्ट्रात राबवत आहेत. शिवसेनेचा गटनेता वेगळा आहे. हे बंडखोर गटाला मान्य नाही. विधानसभा हा आखाडा नाही. सुप्रीम कोर्टाने ११ जुलैपर्यंत वेळ दिलीय. वाट न बघता मध्येच ही चाचणी घेणे कुठल्या संविधानिक चौकटीत येते याचं उत्तर मिळणं गरजेचे आहे. 

तसेच आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे. सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता राहणं गरजेचे आहे. विरोधात बसायला आम्हाला काहीही अडचण नाही. भाजपा-शिवसेनेत बेबनाव झाला नसता तर हे सरकार आले नसते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. सुखदुखात सोबत राहायचं ही प्रामाणिक भूमिका आहे. ज्याच्याशी मैत्री करायची ही प्रामाणिक करायची असंही नाना पटोले म्हणाले. 

सोनिया गांधींचाउद्धव ठाकरेंना फोन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून धीर दिला. आम्ही सोबत आहोत, घाबरण्यासारखं काही नाही. वेळ आल्यास तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ असंही सांगितले आहे. शिवसेनेत स्थिरता राहावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये लोकांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचं कौल दिला. परंतु त्यानंतर घडलेल्या घडामोडीत काँग्रेस सत्तेत आले. आमची विरोधात बसण्याची तयारी आहे असंही नाना पटोलेंनी सांगितले. बंडखोर आमदार अजूनही आम्ही शिवसेनेचे आहोत सांगतायेत. शिवसेनेचे आमदार सभागृहात आल्यानंतर भूमिका बदलू शकते. ही अग्निपरीक्षा बंडखोर आमदारांची आहे असंही पटोले म्हणाले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ