शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 11:53 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे.

अत्यंत नाट्यमय घडामोडी घडून काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आपल्याला ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे मानले जात आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील  मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेता घोषित केला आहे, त्याबाबत तुमचं काय मत आहे, असं विचारलं असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता जाहीर करता येत नाही. शेवटी ज्यांचं विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. आमदार जास्त आहेत. त्यांचाच विरोधी पक्षनेता होतो. याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. तसेच सध्या काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता व्हायला हवा, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगिलते. 

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसचे सदस्य तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, उलट महाविकास आघाडीमधील वज्रमुठ अधिक पक्की होणार, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत बाळासाहेब थोरात यांनी काल चिंता व्यक्त केली होती. थोरात म्हणाले होते की, २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी असल्याची खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. तसेच राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याचेही ते म्हणााले होते.  

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष