शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : मुहूर्त जवळपास ठरला; महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी ३ जुलैला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 10:07 IST

Maharashtra Political Crisis : राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी येत्या ३ जुलै रोजी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आजचा नववा दिवस आहे. मात्र, हा सत्तासंघर्षाचा येत्या चार दिवसात संपण्याची चिन्हे आहेत. राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी येत्या ३ जुलै रोजी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत येणार आणि बहुमत चाचणीसाठी हजर राहणार अशी माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी उद्या मुंबईत येण्याबाबत वक्तव्य केले. 

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता लवकरच राज्यात येण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ३ जुलै हा ठरला आहे. मात्र, ३ जुलैला हैदराबादला भाजपची राष्ट्रीय कार्यकारणी आहे. त्यामुळे ३ जुलैला शपथविधी ठेवायचा की नाही अशी देखील चर्चा सुरू आहे. कदाचित या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे शपथ घेतील आणि नवीन सरकार स्थापन केले जाईल. त्यानंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारणी झाल्यानंतर नंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. 

दुसरीकडे, उद्या बहुमत सिद्ध करण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा असा दबाव त्यांच्यावर शिवसेनेतून आणला जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण बहुमत चाचणी घेऊ असे सांगितले आहे. जर उद्या अधिवेशन झाले तर भाजप आणि बंडखोर गटाकडून सरकारवर आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली जाईल. अधिवेशन लाईव्ह टेलिकास्ट केले जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेची बदनामी होईल असेही सांगितले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, जर त्यांनी राजीनामा दिला तर सरकार कसे व कधी बनवायचे हा प्रश्न सुरू होईल.

याशिवाय, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, अशी भूमिका बंडखोर आमदारांचा गट घेणार आहे. त्यामुळे सरकार भाजप-शिवसेनेचे स्थापन होईल, आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पुढे काही वर्ष चालू राहील, अशी स्ट्रॅटेजी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसानंतर गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना गोव्यात आणण्यात येणार आहे. तेथे एका हॉटेलमध्ये ४२ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणातील एका नेत्याने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. 

उद्याच मुंबईत जाणार - एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणे मागितले आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात. आता आम्ही उद्या सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्ट साठी जाणार आहोत आणि जी कोणतीही प्रक्रिया पार पाडायची असेल त्या पद्धतीची पूर्तता पार पाडण्यासाठी आम्ही उद्याच मुंबईत जाणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ