शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील फाटाफूट पाहून काँग्रेस सावध; सोनिया गांधींनी विश्वासू नेत्याकडे दिली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:18 IST

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्यानंतर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. 

मुंबई : काल झालेल्या विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Elections) राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्यानंतर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. 

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांसोबत कमलनाथ हे चर्चा करणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू नेते मानले जातात.  

विशेष म्हणजे, काँग्रेसचे नेते कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना ज्योतिरादित्य शिंदे यांनीच बंड करत भाजपसोबत हात मिळवणी केली होती. त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह काही आमदार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने सरकार स्थापन करत शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री बनविले आहे.

काँग्रेसला 10 आमदारांची चिंताकाल झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसमध्येच क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे आणि काही मत फुटल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे