शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचं महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय, एकनाथ शिंदेंच्या निमित्तानं स्वाभिमानी मंडळी पुढे येतायत - विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:57 IST

येत्या आषाढीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि तेच पूजा करतील असा विश्वास आमच्या मनात आहे, विखे पाटील यांचं वक्तव्य.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटानंही हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 

“२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनाधार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मिळाला होता. हे विश्वासघातानं सरकार तयार झालं. तेच आज विश्वासघाताची भाषा करतात हे त्यांना शोभत नाही. सत्तेतून ते पायऊतार होतील असा विश्वास सामान्य जनतेच्या, भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. येत्या आषाढीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि तेच पूजा करतील असा विश्वास आमच्या मनात आहे,” असंही विखे-पाटील म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं.

“शिवसेनेचं महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय”“संजय राऊत हा महत्त्वाचा मुद्दा नाही. तो यापूर्वीही नव्हता आणि आताही नाही. त्यांचं काय करायचं हा निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे. शिवसेनेचे महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय आणि अतिशय स्वाभिमानी मंडळी एकनाथ शिंदेंच्या निमित्तानं पुढे येतायत. राज्याला चांगलं सरकार देण्याची त्यांची तयारी झाली आहे. भाजप म्हणून आता आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ