Maharashtra Political Crisis : "१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून...", भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:11 PM2022-06-30T13:11:44+5:302022-06-30T13:12:30+5:30

Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

Maharashtra Political Crisis : "Because 105 MLAs were housed at home ...", BJP leader Chitra Wagh's attack | Maharashtra Political Crisis : "१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून...", भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Maharashtra Political Crisis : "१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून...", भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबतच जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसे संकेतही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एकंदरीत ज्या पद्धतीने गेल्या आठवडाभरापासून घडामोडी घडत आहेत, त्या पाहता पडद्यामागून भाजपच या बंडखोरांना पाठिंबा देत असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

"१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून देवेंद्र फडणवीस यांना हिणवणाऱ्यांनो, त्याच देवेंद्र फडणवीस यांनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय!", असे ट्विट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. याचबरोबर, याआधीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी भाजपचे १०५ आमदार घरी बसवले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला एकत्र आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांनी करून दाखवला, हाच राग भाजप नेत्यांच्या मनात आहे. यालाच ते गुन्हा मानत आहेत, म्हणून ईडीचा ससेमिरा राऊत यांच्या मागे लावण्यात आला असल्याचा आरोप युवा सेनेचे वरूण सरदेसाई यांनी केला होता. तर भाजपच्या १०५ आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात काय दम आहे, हे दाखवून दिलं आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी लगावला होता.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या एक ते दोन दिवसात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. याशिवाय, आज भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवाना
शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे निघाले असून आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांचे सहकारी बंडखोर आमदार गोव्यातच असून ते एकटेच मुंबईकडे निघाले आहेत. दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह तळ ठोकून होते. दुपारी १२.१५ च्या सुमारास केवळ शिंदे हॉटेलमधून विमानतळाकडे जाण्यासाठी बाहेर पडले. पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, 'मी मुंबईला राज्यपालांची भेट घेण्यासाठी जात आहे. माझे सहकारी आमदार तूर्त गोव्यातच राहतील.'

Web Title: Maharashtra Political Crisis : "Because 105 MLAs were housed at home ...", BJP leader Chitra Wagh's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.