शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे ४ आमदार बहुमत चाचणीवेळी गैरहजर? ठाकरे सरकार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:18 IST

राज्यातील शिवसेनेच्या ३९ नाराज आमदारांचा गट हा सरकारच्या विरोधात गेला आहे. तर काही अपक्षही शिंदे गटासोबत आहेत.

मुंबई - राज्यातील राजकारणात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका या आमदारांनी मांडली. विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला. गेल्या २१ जूनपासून शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला पोहचले. 

आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यात नऊ दिवसांनी या प्रकरणात भाजपाने थेट उडी घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी घेण्याची सूचना केली. ३० जून म्हणजे उद्याच विधिमंडळाचं विशेष अधिवेशन भरवलं जाणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सरकार बहुमत चाचणीत टिकेल असा दावा मविआ नेते करत आहेत. परंतु संख्याबळात तुर्तास तरी हे चित्र दिसत नाही. 

राज्यातील शिवसेनेच्या ३९ नाराज आमदारांचा गट हा सरकारच्या विरोधात गेला आहे. तर काही अपक्षही शिंदे गटासोबत आहेत. त्यात मविआमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत आणि नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्हीही नेते क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीसाठी राष्ट्रवादीचे ४ आमदार हजर राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मविआ आणि उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

माझ्या बोलण्याचा इतका त्रास होत असेल तर मी थांबतो- संजय राऊत   शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सगळ्यात जास्त रोष संजय राऊत यांच्यावर व्यक्त केला आहे. त्यावर राऊत म्हणतात की, मी शिवसेनेचीच भूमिका मांडत असतो. माझ्या नेत्यांची भूमिका मांडतो आहे. महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी बोलतो आहे. याचा जर कुणाला त्रास होत असेल तर ठीक आहे मी बोलणं थांबवतो. आपण आधी मुंबईत या. पण मी बोलतोय आणि आदित्य ठाकरे बोलताहेत म्हणून येणार नाही हा बालिशपणा आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत. ते ठाकरे आहेत. त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. बंडखोरांनी आमच्या बोलण्याचं कारण देऊन अशी भूमिका घेणं योग्य नाही", असा टोला राऊतांनी लगावला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ