शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

'महाराष्ट्र पोलीस'आमच्यासाठी देव! तामिळनाडुच्या आजोबांवर 'लॉकडाऊन'मुळे पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 21:26 IST

तामिळनाडुचे रहिवासी असलेले एक आजोबा नाशिकला देवदर्शनासाठी आले होते. पण प्रवासातच घेतला शेवटचा श्वास...

ठळक मुद्देनातवाच्या विनंतीवरुन पार्थिवावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

प्रशांत ननवरे- बारामती : 'कोरोनाच्या लॉकडाऊन' मुळे अनेकांची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. अशाच लॉकडाऊनमध्ये घडलेल्या एक दुर्दैैवी घटनेने खाकीतील माणुसकी अधोरेखित केली आहे. नाशिकला देवदर्शनाला निघालेल्या तामिळनाडुच्या आजोबांनी प्रवासातच शेवटचा श्वास घेतला.मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्या नातुला आजोबांचे पार्थिव देखील महाराष्ट्रातुन तामिळनाडुला नेता आले नाही.शेवटी नातुच्या विनंतीवरुन पोलिसांनीच पणतुवर अंत्यसंस्कार केले. या नातुने कठीण प्रसंगात पोलिसांनी केलेली मदत एका पत्राद्वारे ‘शेअर’ केली आहे.

अरुण मुथाई असे या नातवाचे नाव आहे. अरुण हा चेन्नई, तामिळनाडूचा रहिवासी आहे. त्याचे पणजोबा शिवा स्वामीगल हे शंकराचे भक्त असल्याने नाशिकला देवदर्शनासाठी आले होते. तिथुन माघारी येताना ते पुण्यात कुठेतरी अडकले. त्यांनी अरुण आणि त्याच्या कुटुंबियांना कॉल केला आणि मदत पाहिजे म्हणून सांगितले.मात्र, त्यांचा फोन ‘ डिस्कनेक्ट’ झाला. त्यावर अरुण ने त्यांनापुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला. पण फोनवर संपर्क होवु शकला नाही. शेवटी अरुण आणि त्याच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर तक्रार दिली. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र पोलिसांचा फोन आला , पणजोबांना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. पण उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला . अरुण आणि त्याच्या कुटुंबियांना पणजोबांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप वाईट वाटले.या दरम्यान अरुणला पोलिसांनी  येऊन पणजोेबांचे पार्थिव घेवून जाण्यास सांगितले. पण लॉकडाउनमुळे त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात येत नव्हते. पणजोबांवर अखेरच्या क्षणी अंत्यसंस्कार करता येणार नसल्याने त्यांचे कुटुंब दु:खी झाले.मात्र, कठीण प्रसंगातुन सावरत त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीचे भान राखत पोलिसांनाच त्यांच्या पणजोबांचे अंत्यविधी उरकण्यास सांगितले.त्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र, आवश्यक ती सर्व कागदपत्र पोलिसांनी  पाठविली. त्यांनी देखील परिस्थिती समजून घेऊन सर्वोतोपरी मदत केली. आता सर्व संपलेले आहे. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो,अशा शब्दांत अरुण याने  पत्र पाठवुन पोलिसांच्या कधीही न संपणाºया ऋणातुन उतराई होण्याचा प्रयत्न केला.

      कोरोनाला लढा देण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस २४ तास लढत आहेत.या दोघांनीपार पाडलेल्या प्रामाणिक कर्तव्याचे सर्वांनाच कौतुक आहे. खाकीतील सामाजिक भान,माणुसकी पाहुन गहिवरलेल्या नातवाने आभारपत्र पाठवुन पोलिसांशी भावनिक नाते जोडले.त्यामुळे कोरोना सारख्या कठीण परीस्थितीत पोलिसांनी दाखविलेली खाकीतील माणुसकी अधोरेखित झाली आहे.भिगवणचे पोलीस निरीक्षक  जीवन माने, मुंबई मालवणी पोलीस स्टेशनचे निवृत्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण शिंदे,भिवंडी पोलीस निरीक्षक  मनिष पाटील यांच्यासह बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी मोलाची मदत केल्याचे अरुण यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले  आहे.———————————.... महाराष्ट्र पोलीस आमच्या कुटुंबासाठी देव... भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, २५ मार्च रोजी भिगवण रेल्वे स्टेशनवर एक वृद्ध बेशुद्ध पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धावघेत त्यांना भिगवण येथे उपचारासाठी आणले. मात्र, प्रभावी उपचारासाठी भिगवणमधून त्यांना बारामतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी (दि.५) त्यांचे निधन झाले. पोलिसांनी त्यांचे छायाचित्र आणि वर्णन सोशल मीडियावर, पोलीस प्रशासनामध्ये राज्यात सर्वत्र पाठविले. त्यावर भिवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांनी या वर्णनांशी मिळती जुळती तक्रार ऑनलाईन दाखल झाल्याचे सांगितले. त्यावर खात्री करून अरूण मुथाई यांना मी स्वत: संपर्क साधला. त्यांचे कुटुंबिय त्यानंतर इकडे येण्यासाठी निघाले होते. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू पोलिसांनी त्यांना या ठिकाणी येऊ दिले नाही. त्यामुळे हतबल झालेल्या अरुण यांनी आम्हाला मेल पाठवून पोलिसांनीच अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देखील शासकीय मेलवर पाठविली.

 त्यानंतर पोलिसांनी तेथील त्यांच्या सामाजिक रितीरिवाजानुसार,सोमवारी (दि. ६) बारामती येथील कºहा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार केले.अरुण यांनी सांगितलेले रितीरिवाज पूर्ण करण्याची काळजी पोलिसांनी घेतली.त्यासाठी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारीयोगेश कडुसकर, आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांची मदत झाली. त्या आजोबांकडे मृत्युसमयी १ लाख ३५ हजार १०० रुपयांची रोकड होती.पोलिसांच्या ताब्यात ही रक्कम आहे. लवकरच ती रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर ती रक्कम कोरोना मदतनिधीसाठी देण्याचा मानस त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.अंत्यसंस्कारानंतर अरुण यांनी महाराष्ट्र पोलीस म्हणजे आमच्या कुटुंबासाठी देव म्हणून धावून असल्याचे सांगत अश्रुंना वाट मोकळी करून दिल्याचे पोलीस निरीक्षक माने यांनी आवर्जुन सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीTamilnaduतामिळनाडूDeathमृत्यूPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस