परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वन!; मंत्री देसाई यांनी गुजरातचा दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 02:00 AM2020-12-01T02:00:54+5:302020-12-01T07:47:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या फोटोंसह सोमवारी काही दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात आली आणि त्यात नंबर वनचा दावा करण्यात आला.

Maharashtra is number one in foreign investment !; Minister Desai rejected Gujarat's claim | परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वन!; मंत्री देसाई यांनी गुजरातचा दावा फेटाळला

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वन!; मंत्री देसाई यांनी गुजरातचा दावा फेटाळला

googlenewsNext

यदु जोशी

मुंबई : गुजरातमध्ये देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आली असल्याचा दावा तेथील राज्य सरकारने केल्यानंतर महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने त्यावर पलटवार केला आहे. ‘सर्वाधिक परकीय गुंतवणूक नि:संशयपणे महाराष्ट्रातच होत आहे’ असा दावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना केला. महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात पळवून नेण्याचा तेथील भाजप सरकारचा डाव असल्याची टीका प्रदेश काँग्रेसने केली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवरून आता दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या फोटोंसह सोमवारी काही दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात आली आणि त्यात नंबर वनचा दावा करण्यात आला. गुजरातमध्ये २०१९-२० या वित्तीय वर्षात परकीय गुंतवणुकीत तब्बल २४० टक्के वाढ झाली. एप्रिल-सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांत १.१९ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक गुजरातमध्ये झाली. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ५३ टक्के एकट्या गुजरातमध्ये झाली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. देशाच्या एकूण निर्यातीपैकी या सहा महिन्यांच्या काळात २३ टक्के निर्यात गुजरातने केली, प्रस्तावित गुंतवणुकीतही गुजरातच नंबर वन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने गेली तीन-चार वर्षे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वनवर असल्याचे नमूद केले आहे. गुजरात देत असलेली आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. परकीय गुंतवणुकीचा आकडा त्यांनी शेअरच्या विक्रीचे आकडे धरून केला आहे.

गुंतवणुकीवरून आता महाराष्ट्र-उत्तर प्रदेश संघर्ष
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यराज हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. 
उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. 
त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन  प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातमध्ये पळविण्याचे प्रयत्न आधीपासूनच होत आहेत, असे ते म्हणाले.

 

Web Title: Maharashtra is number one in foreign investment !; Minister Desai rejected Gujarat's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.