शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजितदादांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 21:36 IST

राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे.

मुंबईः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या २९व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चुरस असल्याचं समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यास काँग्रेस तयार असली तरी त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. पण राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमधल्या अध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून काँग्रेसने मात्र दोन उपमुख्यमंत्री करावे, विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे, असा तोडगा सुचवला आहे. 

त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. तिन्ही पक्षांच्या बैठकीत जबाबदारी देत असताना अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या(काँग्रेस)कडे द्यायची आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे द्यायची, असं ठरलं आहे. तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी शिवसेनेकडे द्यायची आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे द्यायची, असं निश्चित झालेलं आहे. तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी जी काही नाव ठरवलेली होती, त्यांनी काल शपथ घेतली. बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, असं म्हणत अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एकच उपमुख्यमंत्रिपद असेल व विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल, असा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. गुरुवारी दिवसभरात बऱ्याच घडामोडी झाल्या. काँग्रेसने अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित केले होते. परंतु त्या नावाला राष्ट्रवादीनं विरोध केल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे असे ठरले तिन्ही पक्षांचं ठरलं होतं. पण आता काँग्रेसला १३ मंत्रिपदे हवी आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळतं हे येत्या काळात समजणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना