वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:55 IST2025-12-22T07:54:29+5:302025-12-22T07:55:08+5:30
Maharashtra Nagar Parishad Election Results: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालात राज्यातील एक नगराध्यक्ष पदासह ७० नगरसेवक पदांवर वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे.

वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालात राज्यातील एक नगराध्यक्ष पदासह ७० नगरसेवक पदांवर वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी नगराध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीने विजय मिळविला आहे. बार्शिटाकळी नगराध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीच्या अख्तर खातून अलीमोद्दीन विजयी झाल्या आहेत.
नगरपरिषदांसह नगरपंचायतींच्या नगरसेवक पदांसाठी वंचित बहुजन आघाडीचे ७० नगरसेवक विजयी झाले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात २५, चांदूररेल्वे ५, अहिल्यानगर ५, संगमनेर २, शेगाव १, यवतमाळ ३, जळगाव जामोद १, कंधार १, नागपूर जिल्ह्यातील वाडी ४, कणकवली १, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती ३ व गडिचरोली १ आदी ठिकाणच्या नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रदेश प्रमुख जीतरत्न पटाईत यांनी दिली.