23 Mar, 26 06:07 PM
३३% जागा महिलांसाठी राखीव
लोकसभेच्या एकूण जागांपैकी ३३% जागा महिलांसाठी राखीव ठेवणार. केंद्र सरकार अधिवेशनात आणणार महिला आरक्षण संशोधन विधेयक.
23 Mar, 26 06:02 PM
"प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मध्य पूर्वेतील संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या विधानावर केजरीवाल यांनी जोरदार पलटवार केला. "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं? या सरकारच्या अपयशाची किंमत सामान्य माणसालाच का मोजावी लागते?" असा सवाल देखील विचारला आहे. वाचा सविस्तर
23 Mar, 26 05:24 PM
५ दिवसांसाठी हल्ले थांबवा, ट्रम्प यांचे सैन्याला आदेश
मी युद्ध विभागाला इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय सध्या सुरू असलेल्या बैठका आणि वाटाघाटींच्या निकालावर अवलंबून असेल अशी माहिती अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
23 Mar, 26 05:08 PM
माजी मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांना अटक
पंजाबमधील गगनदीप सिंग रंधावा आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी आणि माजी मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना फतेहगड साहिब जिल्ह्यातील मंडी गोविंदगड येथून अटक केली. एफआयआर (FIR), सुसाईड व्हिडीओ आणि कुटुंबीयांनी केलेले गंभीर आरोप यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनलं आहे. हे प्रकरण आता संसदेपर्यंत पोहोचले असून याची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. वाचा सविस्तर
23 Mar, 26 04:58 PM
कोल्हापूरात उपोषण दडपण्याचा आरोप; आंदोलनकर्ते आक्रमक
कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाबाहेरील उपोषण पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. साताऱ्यातील म्हसवडमध्ये बनावट गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाची धिंड काढल्याच्या प्रकरणाविरोधात केलेलं उपोषण होते.
23 Mar, 26 04:16 PM
बुलढाणा : शिवसेना शिव लहुसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पारंपारिक बँड पथकाचा वापर केला जात होता, मात्र विविध कारणांमुळे अलीकडच्या काळामध्ये याचा वापर कमी झाल्याने या बँड पथकातील संपूर्ण कलावंतांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे बँड पथकातील कलाकारांना लोक कलावंताचा दर्जा देण्यात यावा, त्यांना शासकीय मानधन देण्यात यावे, बँड पथकाला पुनर्जीवित करण्यासाठी 10 लाख रुपयांचे शासकीय अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शिवसेना शिवलहू सेनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
23 Mar, 26 02:15 PM
युद्धामुळे भारतासमोर अनपेक्षित आव्हाने: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हानेही उभी राहिली आहेत. ही आव्हाने आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणि मानवतावादी आहेत."
23 Mar, 26 02:15 PM
३ लाख ७५ हजार भारतीय परतले : पंतप्रधान मोदी
लोकसभेत पंतप्रधानांनी सांगितले की, युद्धानंतर भारत आणि इतर देशांमध्ये २४x७ हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. या हेल्पलाईन आवश्यक माहिती पुरवत आहेत आणि सूचना जारी करत आहेत. या संकटाच्या काळात आपल्या लोकांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. संकटकाळातही ३,७५,००० भारतीय सुखरूप देशात परतले आहेत.
23 Mar, 26 02:23 PM
तेल आणि गॅसचे संकट निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत : पंतप्रधान
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कच्चे तेल आणि खते यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून देशात येतात. युद्धामुळे या भागातून होणारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. असे असूनही, होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे देशात तेल आणि गॅसचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हे संकट कमी करण्यासाठी, जिथे पूर्वी २७ देशांकडून आयात केली जात होती, तिथे आता ४१ देशांकडून आयात केली जात आहे.
23 Mar, 26 02:17 PM
होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल पंतप्रधान काय म्हणाले?
होर्मुझ सामुद्रधुनीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि खते होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करून आणावी लागतात. पेट्रोल आणि एलपीजीचा तुटवडा भासू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देश आपल्या गरजेच्या ६० टक्के आयात करतो."
23 Mar, 26 02:12 PM
लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सभागृहाला आवश्यक माहिती आधीच दिली आहे. युद्धाचे हे संकट तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. त्याचा लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. संपूर्ण जग सर्व पक्षांना यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन करत आहे.
23 Mar, 26 02:11 PM
सरकार संवेदनशील, सतर्क आणि मदतीसाठी सज्ज आहे: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात लोकसभेला संबोधित करत आहेत. गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे संबोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. म्हणूनच संपूर्ण जग पंतप्रधान मोदींच्या संबोधनाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षावर आणि त्याचा भारतावर होणाऱ्या परिणामावर चर्चा करण्यासाठी या सभागृहात आलो आहे. तेथील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे."
23 Mar, 26 02:11 PM
भारत गरजेच्या ६० टक्के गॅस आयात करतो: नरेंद्र मोदी
भारत गरजेच्या ६० टक्के गॅस आयात करतो, २७ देशांमधून हा गॅस आयात केला जातो. ६५ लाख मेट्रिक टन गॅससाठ्याच्या क्षमतेवर काम सुरू आहे, असेही मोदी म्हणाले.
23 Mar, 26 02:08 PM
संकटकाळात भारताची एकजूट जगाला दिसली पाहिजे - पंतप्रधान मोदी
23 Mar, 26 01:53 PM
सांगली: शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगलीत शेतकऱ्यांचे आंदोल
सांगली जिल्ह्यातून प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. प्रस्तावित Nagpur-Goa Shaktipeeth Expressway मुळे हजारो शेतकऱ्यांची जमीन जाणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
23 Mar, 26 01:37 PM
आम्ही भाजपसोबत निवडणूक पूर्व युती केली होती- महेश शिंदे
"माझ्या मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एक बैठक बोलवली होती. त्यावेळी भाजपचे प्रमुख नेते, अजित पवार गटाचे नेते होते. त्यावेळी असं ठरलं की आपल्या आपल्या मतदारसंघातील आमदार यावर निर्णय घेतील. त्यावेळी मी सुद्धा प्रयत्न केले. आम्ही भाजपसोबत निवडणूक पूर्व युती केली होती. आम्ही भाजपसोबत एकत्र लढलो आणि नंतर कळलं की आपण काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत जातोय. ते आमच्या लोकांना आवडलं नाही. आम्ही महायुतीसोबत जाण्यासाठी तयार होतो. पण महाविकास आघाडीसोबत आम्ही जाऊ शकत नाही," असं महेश शिंदे म्हणाले.
23 Mar, 26 12:52 PM
राज्यातील सर्वच भोंदूबाबांकडून सामान्यांची फसवणूक - रामदास आठवले
राज्यात अनेक ठिकाणी भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा पसरवणारे लोक सामान्य नागरिकांची फसवणूक करत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलली पाहिजेत. तसेच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावरही कठोर कारवाई करावी असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
23 Mar, 26 11:50 AM
इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रवेश बंदी - महापौर
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रवेश बंदी - महापौर मंजुषा नागपुरे
महिला नगरसेविकांचे व्हिडीओ समाज माध्यमात प्रसारित केल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. सभागृह नेता गणेश बिडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या संदर्भात एसओपी तयार करण्यास सांगितलं.
23 Mar, 26 11:24 AM
शेतकरी आक्रमक
23 Mar, 26 11:22 AM
मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन
आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलनास सुरुवात. शेतकरी आक्रमक. महामार्गावर कुडाळजवळ टायर पेटवून निदर्शनं.
23 Mar, 26 10:40 AM
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा- उपसभापती निलम गोऱ्हे
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यानंतर विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दाखल घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत.
23 Mar, 26 10:08 AM
शेअर बाजारात मोठी घसरण
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाल्यामुळे आणि जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी मोठ्या घसरणीसह उघडला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १३१६.७६ अंकांनी घसरून ७३,२१६.२० च्या पातळीवर व्यवहार करत होता.
23 Mar, 26 10:00 AM
होर्मुजची सामुद्रधुनी उघडणार की नाही? इराणचे स्पष्ट उत्तर
मिडल ईस्टमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर, इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जर अमेरिकेने आमच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला केला, तर स्ट्रॅट ऑफ होर्मुज कायमची बंद करू," असा थेट इशारा इराणने दिला आहे.
23 Mar, 26 09:35 AM
LPG संकट: आता १४ किलोच्या सिलेंडरमध्ये मिळणार फक्त १० किलो गॅस?
इराण आणि अमेरिका, इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट फटका आता तुमच्या स्वयंपाकघराला बसण्याची शक्यता आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी गॅसची वाहतूक ठप्प झाल्यामुळे देशातील एलपीजीचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी गॅस कंपन्या आता १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरमध्ये केवळ १० किलो किंवा ७ किलो गॅस भरून पुरवठा करण्याचा विचार करत आहेत. अधिक वाचा...
23 Mar, 26 09:34 AM
अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळात उमटणार
भोंदूबाबा अशोक खरात याच्या दृष्कृत्यांची चर्चा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या मुद्यावर सोमवारी विधिमंडळात विरोधक आक्रमक होतील. या ‘कॅप्टन फाईल’मध्ये अडकलेले नेते, सरकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.
(वाचा सविस्तर)
23 Mar, 26 09:33 AM
इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला
मध्य-पूर्वेतील तणाव आता टोकावर पोहोचला आहे. इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला करत युद्धाची ठिणगी टाकली आहे. शनिवारी उशिरा रात्री इराणने जेरुसलेम आणि वेस्ट बँकमधील भागांना लक्ष्य केले. विशेष म्हणजे, यावेळी इराणने 'क्लस्टर वॉरहेड' असलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये एअर रेड सायरन वाजले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.